Vegetable Nursery : भाजीपाला रोपवाटीका कशी तयार कराल?

Vegetable Crop : रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो.
Vegetable Nursery | Vegetable Rate
Vegetable Nursery | Vegetable RateAgrowon

Vegetable Management : भाजीपाला पिके ही हंगामी स्वरूपाची असतात. अनेक रोग व किडींना ते लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत बळी पडत असतात. रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो.

भाजीपाला पिकापैकी पालेभाज्या, गाजर, मुळा, भेंडी, घेवडा इ. बी कायम जागी लावून लागवड करतात, तर टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारख्या भाजीपाला पिकांची प्रथम रोपे तयार करून नंतर कायम जागी लावतात.

रोपे तयार करण्याचे सुद्धा एक खास तंत्र आहे. रोपवाटीका तयार करताना काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली पाहिती पुढीलप्रमाणे.

रोपे कशी तयार करावीत ?

रोपवाटिकेकरिता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन वापरू नये. 

योग्य जमीन निवडल्या नंतर त्यात गुंठ्याला १ गाडी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. २० ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगारणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

जमीन भुसभुशीत केल्यानंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. 

Vegetable Nursery | Vegetable Rate
Amla Processing : आवळा कॅन्डी कशी तयार कराल?

भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. 

बियाणे चांगले नसेल तर भाजीपाल्याच्या लागवडीत इतर बाबीवर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते. 

संकरित बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. दोन ओळींतले अंतर ६ सें. मी. ठेवावे. 

उन्हाळी हंगामात जमिनीचा वरचा थर कडक होऊ नये म्हणून, तसेच हिवाळ्यात आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट, भात, गहू पिकाचे तूस हलके पसरावे व १० ते २० टक्के मोड दिसू लागल्यावर काढावे. 

बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे.

बियांची पेरणी झाल्यापासून बी रुजणे, मोड येणे आणि पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना पिकानुसार ६ ते ८ दिवसांत होतात. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com