Safflower Cultivation : करडई लागवडीचे सुधारित तंत्र कोणते?

करडई पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही.
Safflower Cultivation
Safflower CultivationAgrowon

करडई पिकाला (Safflower Crop) करडई पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस (Rain) आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. अतिउष्णता आणि अतिथंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो. पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल ओल टिकून ठेवणारी परंतु चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे पीक येते. सोयाबीन काढल्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर कुठलीही मशागत न करता हे पीक घेता येते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने दिलेल्या निकषानूसार पुढील प्रमाणे करडईची लागवड करावी. 

Safflower Cultivation
काय आहेत ज्वारी, करडई, कापसाच्या नवीन वाणाची वैशिष्ट्ये ?

जमीन कशी निवडावी?


अति खोल किंवा अति उथळ पेरणी केल्यास उगवण होत नाही. म्हणून योग्य ओलावा पाहून योग्य खोलीवर पेरणी करावी. तसेच मूग व उडीद यानंतर हे पीक हमखास येते. बियाणे पाण्यात भिजवून नंतर रात्रभर सुकवून पेरणी केल्यास उगवण एकसारखी होते व रोपांची संख्या एकसारखी राखली जाते. करडईचे एकच पीक घ्यायचे असल्यास एक वेळ नांगरणी व वखरणीच्या दोन ते तीन पाळ्या देऊन नंतर काडी कचरा वेचून जमीन चांगली भुसभुशीत करावी. 

पूर्व मशागत करताना शेणखत हेक्टरी पाच टन शेवटची वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे. बियाणे शिफारशीनुसार भारी जमिनीत हेक्टरी १० किलो तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो वापरावे. संकरित वाणाचे ७.५ किलो बियाणे वापरावे. 

Safflower Cultivation
सुधारित करडई लागवड तंत्रज्ञान

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्याला अझोटोबॅक्‍टर अधिक पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया प्रत्येकी २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्याला करावी. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी किंवा शेणखतातून जमिनीत मिसळावे. 

वाणांची निवड

पेरणीसाठी ए के एस २०७, भीमा, पी. के. व्ही. पिंक, परभणी कुसुम, नारी एन. एच. १ या संकरित वाणांची निवड करावी. 

पेरणीची वेळ

करडईची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो व उत्पादन चांगले मिळते. उशिरा ते अति उशिरा पेरणी केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ओलिताखालील करडईची पेरणी ऑक्टोबर च्या शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरात उशिरा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास उगवण लवकर व चांगली होते. पेरणी दोन चाडाच्या पाभरीने करावी म्हणजे बियाणे व खते एकाच वेळी देता येतील. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. 

खत व्यवस्थापन

हे पीक रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते. कोरडवाहू करडई पिकास पेरणी सोबत ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद प्रति हेक्टर द्यावे. पिकाची विरळणी उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी करून दोन रोपात २० ते ३० सेंमी अंतर राखावे. हेक्टरी झाडांची संख्या ७५ हजार ते एक लाखापर्यंत ठेवावी. आवश्यकतेनुसार एक दोन वेळा निंदणी व डवरणी करून जमीन तण विरहित व भूसभूषित केल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com