Soil Health : शेतीसाठी योग्य गाळ कोणता?

अतीउथळ व मुरमाड जमिनीमध्ये चिकन मातीच प्रमाण आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनीतून मिळणारं उत्पादनही कमी असतं. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात हलक्या रानात गाळमाती मिसळतात.
Soil Health
Soil HealthAgrowon

अतीउथळ व मुरमाड जमिनीमध्ये चिकन मातीच प्रमाण आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनीतून मिळणारं उत्पादनही कमी असतं.  त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात हलक्या रानात गाळमाती मिसळतात. पण गाळ मिसळताना त्या गाळाची गुणवत्ता किंवा प्रत लक्षात घेतली जात नाही.

किंवा मिळेल त्या ठिकाणचा गाळ मिसळला जातो. त्यामुळे जमिनीत जास्त किंवा कमी प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्यामुळे जमिनी चीबड किंवा पानथळ होण्याचा धोका असतो. जमिनीमध्ये योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात व योग्य प्रतीचा तळ्यातील किंवा  धरणातील गाळाचा उपयोग करावा. त्यामुळे गाळाचा म्हणावा तसा फायदा मिळवता येतो. तर उथळ जमिनीसाठी योग्य प्रतीचा गाळ कोणता असतो याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

तळ्यातील गाळामध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त म्हणजेच ५० ते ७० टक्के असतं. गाळमातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते तर जलवाहका कमी असते. उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण त्या परिसरातील माती पेक्षा २० ते २५ टक्क्यांनी जास्त असते. त्यामुळे तळ्यातील गाळाचा वापर केल्यानंतर त्या जमिनीचे जैविक गुणधर्म दुपटीने वाढतात. अशा प्रकारच्या गाळाचा उपयोग अति उथळ किंवा मुरमाड जमिनीत योग्य पद्धतीने व तंज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने केल्यास त्या जमिनीची जलधारण क्षमता, सुपिकता व उत्पादकता वाढते.  

Soil Health
Soil Health : काळ्या आईला वाचवायला हवे

तळ्यातील गाळाची प्रत ही ज्याठिकाणी कमी कालावधीकरिता तळ्यात पाणी साठून असते अशा ठिकाणावरील गाळामध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी असतं. याशिवाय उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त असते.

त्यामुळे गाळाची निवड करताना १५० सेंमी वरच्या थराचा तसेच ज्याठिकाणी तळ्यात कमी कालावधीसाठी पाणी साठून असते म्हणजेच बॅकवॉटर च्या ठिकाणावरील गाळास प्रथम प्राधान्य द्यावं. त्यानंतर इतर भागातील गाळाचा वापर करावा. तळ्यातील गाळाचे परिक्षण करुन  तज्ञांचा सल्ला घ्यावा.

जमीन जर खडकाळ, मुरमाड असेल तर जमिनीची खोल नांगरणी करुन ५ ते १० सेंमी मुरमाचा थर तयार करावा. नांगरणी नंतर निघालेले दगड वेचून शेताबाहेर टाकावे किंवा शेताला बांध बंदिस्ती करावी. जेणेकरुन टाकलेला गाळ शेताबाहेर वाहून जाणार नाही. अशाप्रकारे शेत तयार करुन घेतल्यानंतर प्रती हेक्टर ३०० ते ३५० ट्रॅक्टर गाळ टाकावा.

त्यानंतर १५ ते २० सेंमी जाडीचा थर तयार होईल अशाप्रकारे शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ पसरुन द्यावा. आणि शेत पेरणीसाठी तयार करावे.  अशा पद्धतीने तळ्यातील गाळाचा वापर केल्यास जमिनीचा पोत व उत्पादन क्षमता वाढते व तळ्याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com