Water Conservation : पावसाळ्यापुर्वी जलसंधारणासाठी कोणते उपाय योजाल?

सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी जल संधारण व व्यवस्थापनाच्या कोणत्याही उपाययोजना या केवळ पावसाने ओढ दिली, दुष्काळ सदृश परिस्थितीत करून उपयोग नाही.
Soil And Water Conservation
Soil And Water ConservationAgrowon

राज्यातील विविध भागात पडणारे एकूण पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस यामध्ये विषमता आहे. बऱ्याचदा पाऊस सरासरीसुद्धा गाठत नाही.धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते.

सुमारे ७० टक्के कोरडवाहू (Rainfed) असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी जल संधारण व व्यवस्थापनाच्या कोणत्याही उपाययोजना या केवळ पावसाने ओढ दिली, दुष्काळ सदृश परिस्थितीत करून उपयोग नाही.

या कायमस्वरूपी करत राहिल्या पाहिजेत. शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन (Water Management) आणि सूक्ष्म सिंचन (Micro irrigation) पद्धतीचा वापर करुन पावसाचं पाणी शेतात मुरवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

शेतातील पाणी जिरविण्याचे सोपे तंत्र

शेतास एका दिशेने उतार असल्यास उतरला आडवी मशागत, पेरणी व कोळपणी करावी.

शेतास एकापेक्षा जास्त दिशेने उतार असल्यास समतल रेषेला समांतर मशागत, पेरणी व आंतरमशागत करावी.

समतल रेषेवर खस गवत, सुबाभूळ, घायपात, स्थानिक गवताचे जैविक बांध तयार करावेत.

Soil And Water Conservation
Nematode Control : सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय कोणते?| ॲग्रोवन

शेतातील ओघळीवर, नाल्यात दगडी बांध, माती बांध, ब्रशवुड बांध, जाळीचे बांध घालावेत.

नादुरुस्त, फुटलेले बांध पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत.

अस्तित्वात असलेल्या नालाबंधातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता अबाधित राखावी.

शेततळे, विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण करण्याला प्राधान्य द्यावं.  

पावसाळ्यापुर्वी मृद व जल संधारणासाठी ढाळीची बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच शेत बांधबंदिस्ती करावी. याशिवाय मजगी म्हणजेच भात खाचरांची बांधबंदिस्ती करावी. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com