Silk Farming : रेशीम किटक संगोपनगृह कसे असावे?

रेशीम किटक संगोपनागृहात २२ ते २८ अंश सेल्सीअस तापमान व ८० ते ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे.
What should be a silkworm breeding house like?
What should be a silkworm breeding house like?Agrowon

रेशीम उदयोग (Silk Framing) हा मोठया प्रमाणाव रोजगार उपलब्ध करुन देणारा उदयोग आहे. महाराष्ट्र राज्य रेशीम उत्पादक अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर आहे. कर्नाटक, आंध्रपदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडु या राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या उदयोगास असणा-या अनुकूल हवामानामुळे उदयेागाच्या प्रगतीला वाव असून मागील पाच वर्षात राज्यात रेशीम किटक संगोपनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

रेशीम उदयोगासाठी पक्कया संगोपनागृहाची आवश्यकता असताना देशातील ८० टक्के शेतकरी मात्र कच्च्या शेड नेट किंवा संगोपनगृहात रेशीम उदयोग करतात.  कारण देशात अल्पभुधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पक्‍के किटकसंगोपन गृह बांधणीसाठी आर्थिक गुंतवणूक करणे त्यांना शक्य होत नाही.

What should be a silkworm breeding house like?
रेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य तापमान, आर्द्रता

रेशीम किटक संगोपनागृहात २२ ते २८ अंश सेल्सीअस तापमान व ८० ते ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कच्‍च्‍या शेडनेट मध्ये पावसाळा व हिवाळा या ऋतुतील ८ महिनेच हा उदयोग करणे शक्य आहे. कारण कच्च्या शेडमध्ये रेशीम किटक वाढीसाठी आवश्यक तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रीत करणे शक्य होत नाही. त्यामुळेच रेशीम किटक तुती पाने खात नाहीत. त्याचा सरळ परिणाम किटकाच्या वाढीवर होऊन रेशीम कोष उत्पादनात घट होते. तुती लागवड क्षेत्रानुसार किटक संगोपन गृहाचे बांधकाम होणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असेल तर किटक संगोपन गृह आराखडा कसा असावा या विषयी पुढील माहिती दिली आहे.  

What should be a silkworm breeding house like?
Silk Farming : रेशीम शेतीतून मिळाला ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

एक एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा

तुती बागेचे एकुण क्षेत्र : १ एकर

कोषाचे पिक/वर्ष : ५ पीके

एका वेळी जास्तीत जास्त अंडीपुज घेण्याची क्षमता : २५० ते ३०० रोगमुक्त अंडीपुंज

१०० अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र : ७०० ते ७५० चौ.फुट

किटक संगोपन गृह आकार : ८२ x २३ x १५ फुट

संगोपनगृह : ७० x २३ फुट

तुती फांदया साठवण गृह  : १२ x १३ फुट

बाल्य किटक संगोपनगृह  : १२ x १० फुट

एका रॅकसाठी लागणारे चटई क्षेत्र  : ३० x ५ = १५० चौ फुट

चार ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र  : १५० x ४ = ६०० चौ.फुट

चार ताळी दोन रॅकचे चटई क्षेत्र  : ६०० चौ. फुट x ४ = २४०० चौ.फुट

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com