Fruit Processing : विविध फळांपासून कोणते मुल्यवर्धीत पदार्थ बनतात?

द्राक्ष, आंबा, संत्री, डाळिंब, कलिंगड या ताज्या फळांची पाश्चात देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फळांपासून उत्तम प्रतीचे प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात.
Fruit Processing
Fruit Processing Agrowon

फळांच उत्पादन (Fruit Production) हंगामी स्वरूपाच असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळे बाजारात येतात. ताज्या फळांची साठवण (Fruit storage) क्षमता कमी असल्यामुळे फळे दीर्घकाळ साठवता येत नाहीत.

भाव नसल्यामुळे अनेकवेळा शेतकरी फळे किंवा भाजीपाला कवडीमोल भावाने विकतात किंवा कष्टाने पिकवलेला शेतमाल फेकूनही दिला जातो.त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याच मोठ आर्थिक नुकसान होतं म्हणून अशावेळी

स्थानिक पातळीवर योग्य प्रशिक्षण घेऊन फळांवर प्रक्रिया (Fruit Processing) करून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर चांगला फायदा होऊ शकतो.

द्राक्ष, आंबा, संत्री, डाळिंब, कलिंगड या ताज्या फळांची पाश्चात देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फळांपासून उत्तम प्रतीचे प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात.

यामध्ये फळांचे जॅम, रस, हवाबंद केलेली फळे, लोणची परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. एकूण निर्यातीमध्ये फळांचे रस, पल्प यांचा वाटा सुमारे २७ टक्के तर सरबत आणि लोणची यांचा वाटा अनुक्रमे १३ व १२ टक्के एवढा आहे.  

फळे व भाजीपाल्यापासून विविध मूल्यवर्धीत पदार्थ महिलांना घरगुती स्वरूपात कमी खर्चात तयार करण्याजोगे आहेत.

ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून कच्चामाल या व्यवसायासाठी सहजपणे उपलब्ध होतो. फळे व भाजीपाल्यापासून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करता येतात. 

Fruit Processing
Fig Processing : अंजिरापासून बनतात हे पदार्थ

केळी 

कच्च्या केळीचे चिप्स, सुकेळी, केळीचा रस्सा, सरबत, भुकटी, वाईन, प्युरी, कॉन्सन्ट्रेट, गर आणि टॉफी 

आंबा 

गर, रस, नेक्टर, टॉफी, मुरंबा, सरबत, पेय, आंबापोळी, लोणचे 

पपई 

कँडी, टूटीफ्रूटी, लोणचे, टॉफी,मुरंबा आणि गर 

पेरू 

गर, रस, पेय, जॅम, जेली, सॉस, टॉफी, चीज, वाइन, 

Fruit Processing
Guava Processing : पेरु पासून बनतात विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

चिकू 

जॅम, सॉस, सरबत, मिल्कशेक, भुटकी

आवळा 

रस, सरबत,स्क्वॅश, मुरंबा, कँडी, च्यवनप्राश, लोणचे, सुपारी 

डाळिंब 

रस, सरबत, अनारदाना, मनुका, चूर्ण, सीरप, सॉस, जेली 

संत्रा, मोसंबी, लिंबू 

रस, सरबत, सुगंधी तेल, लोणचे 

सीताफळ 

गर, मिल्कशेक, सरबत, टॉफी, रबडी, भुटकी

चिंच 

सॉस, गर, कॉन्संट्रेट, पावडर, चिंचोका पावडर, टॅनिन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com