अतिवृष्टीमध्ये सोयाबीन पिकाची काय काळजी घ्याल ?

शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Soybean
SoybeanAgrowon

मागील पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन (Soybean) पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत. अशा परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा (Fungal Diseases) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांमध्ये पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे .अशा परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा.

Soybean
सोयाबीन उत्पादकांना चिंतेने ग्रासले

- सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे त्यासोबतच चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे. जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम शेतातून लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा.

Soybean
अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन कसे कराल?

वाफसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. काही प्रमाणात व्यवस्थापनही होते. या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन ची ५० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या फवारणीने जर सोयाबीनची पाणे हिरवी नाही झाली तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. या पावसामुळे वाणी किंवा पैसा या किडीचा नैसर्गिक रित्या बंदोबस्त होतो.

Soybean
Kharif Sowing : कापूस, सोयाबीन, तुरीच्या पेरण्या अंतिमतेकडे

सध्याच्या परिस्थितीत गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे अशावेळी शंखी गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायीच्या नियंत्रणाकरिता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.

पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चार किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.
- खोडमाशी व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस (५० टक्के) २० मिली किंवा मिश्रकिटकनाशक लॅबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) अधिक थायोमीथॉक्झाम (१२.६ टक्के) ५० मिली प्रती एकर फवारावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com