गहू निर्यात : सावध, ऐका पुढल्या हाका

युद्धवर्षामध्ये अन्नसुरक्षेसाठी अतिरिक्त धान्यसाठा करण्याकडे सर्व देश लक्ष देत असताना आपण आपली कोठारे जगासाठी खुली करताना सावधगिरी दाखवण्याची गरज आहे.
Wheat Export
Wheat ExportAgrowon

युद्धवर्षामध्ये अन्नसुरक्षेसाठी अतिरिक्त धान्यसाठा (food security in war years) करण्याकडे सर्व देश लक्ष देत असताना आपण आपली कोठारे जगासाठी खुली करताना सावधगिरी दाखवण्याची गरज आहे. तसेच इंडोनेशियासारखा देश पाम तेलावर (Countries like Indonesia on palm oil) जगाला नाचवत असताना आपण गहू, तांदळासारख्या (Wheat, Rice) कमोडिटीजचा वापर निदान खाद्यतेलावरील (Edible Oil) वाढलेल्या खर्चाची अधिकाधिक भरपाई करण्याच्या दृष्टीने करायची दक्षता तरी निश्‍चितच घ्यायला हवी. जग खनिजतेल, गॅस शिवाय राहू शकेल, पण अन्नाशिवाय नाही या कोरोना काळात मिळालेल्या धड्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे.

शेतीमाल बाजारपेठेमध्ये (agricultural market) देशपातळीवरील प्रमुख पिकांपैकी हरभरा आणि अगदी अलीकडील दिवसांत कांदा (Onion) सोडला, तर बहुतेक वस्तूंचे भाव चांगलेच तेजीमध्ये आहेत. हरभरा मात्र हमीभावाच्या ५-७ टक्के खालीच आहे. पण जूनपर्यंत तो हमीभावाची पातळी गाठेल, अशी बाजारातील परिस्थिती सांगते.

रशिया-युक्रेन युद्ध (Russia - War) थांबेल थांबेल असे वाटत असताना अमेरिका युक्रेनला शस्त्र आणि पैशांचा पुरवठा करून युद्ध चालूच कसे राहील, याची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. असे केल्याने रशियावर (Russia) बंधने टाकून त्यातून अमेरिकी शस्त्रास्त्रे, खनिज तेल, गॅस आणि शेतीमालाच्या बाजारपेठेचा विस्तार होतोच; शिवाय किमती वाढल्यामुळे देशात प्रचंड पैसे येतात, ते वेगळेच. मात्र अमेरिका आणि रशियाच्या या महायुद्धात इतर देशांची (country) वाताहत होत आहे, याचा ते विचार करत नाहीत आणि करणारही नाहीत. आता तर रशियाने तिसरे महायुद्ध (Third War) सुरू झाल्याचे सांगून वातावरण कमालीचे बिघडवून टाकले आहे.

Wheat Export
इजिप्त घेणार भारताकडून ३० लाख टन गहू !

अशा परिस्थितीमध्ये इतर अनेक आशियायी आणि युरोपियन देशांच्या तुलनेत भारताची अवस्था समाधानकारक आहे. खाद्यतेल (Edible Oil) अव्वाच्या सव्वा भावाने आयात करावे लागत असले, तरी गहू, तांदूळ आणि मका यांच्या निर्यातीत नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. तरीही निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा आयातीवरील खर्चात प्रमाणाबाहेर वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे रुपयावर मोठा दबाव निर्माण होऊन आधीच वाढलेल्या महागाईमध्ये आणखी भर पडत आहे. युद्धामुळे (War) बदललेल्या परिस्थितीचा, आणि पेट्रोल, डिझेल, कोळसा, खाद्यतेल आदींच्या वाढलेल्या किमतींचा समावेश अजूनही महागाईमध्ये पूर्णपणे झालेला नसल्याने पुढील काळात ही महागाई नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.

गहू निर्यातीचा गवगवा (Wheat exports skyrocket)
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे भारताला गहू निर्यातीच्या (Wheat Export) आयत्या चालून आलेल्या संधीचा मोठा गवगवा केला जातोय. मागील आर्थिक वर्षात ७७ ते ७८ लाख टन गहू निर्यात झाला. त्यामुळे सरकारी स्तरावर या वर्षात १०० लाख टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक बाजारातील (World Market) परिस्थिती पाहता निर्यात १२०-१५० लाख टनापर्यंत गेली तरी आश्‍चर्य वाटायला नको. एक तर भारतात आजपर्यंत अनेकदा गव्हाच्या प्रचंड साठ्यांचा आर्थिक भुर्दंड सरकारवर पडत आला आहे. त्यामुळे या वेळी तो कमी करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक निर्यात कशी होईल, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असणे स्वाभाविक आहे. परंतु शेतीमालाच्या आयात-निर्यातीसंदर्भात दीर्घकालीन धोरणे आखताना जागतिक बाजारपेठेमध्ये (World Market) नेहमीच पुढील एक-दोन वर्षांच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करायची आवश्यकता असते. कारगिल, ओलाम, लुईस ड्रेफुस किंवा एडीएम यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आज एवढ्या मोठ्या होण्याचे एक कारण म्हणजे त्यांचा दीर्घकालीन मार्केट इंटेलिजन्स कमालीचा कार्यक्षम असतो.

Wheat Export
Market Bulletin: शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच बातम्या

आता भारतातील चित्र पाहू. भारतात गेली काही वर्षे गव्हाचे विक्रमी उत्पादन होत असल्यामुळे किमती काबूत राहिल्या. सरकारी आकड्यानुसार गहू उत्पादन (Wheat Production) ९०-११० दशलक्ष टन या कक्षेत राहिले आहे. तर व्यापारी अनुमाने ८०-९५ दशलक्ष टन अशी आहेत. तरीही देशांतर्गत मागणी पूर्ण करून वर्षाअखेर भारतीय अन्न महामंडळाकडे १०-१२ दशलक्ष टन गहू (Wheat) निदान कागदावर तरी शिल्लक असायचा. या एकाच गोष्टीमुळे किमती स्थिर राहून अन्न महागाई नियंत्रणात राहायला मदत व्हायची. परंतु हा साठा ८ दशलक्ष टन एवढा घसरल्यामुळे २०१७ साली किंमती भडकलेल्या आपण पाहिल्या आहेत.

या वर्षी गहू उत्पादनाचे अनुमान १११ दशलक्ष टन असे असले तरी जमिनीवरची परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. मागील महिन्याभरात आलेल्या उष्णतेच्या लाटा आणि त्यापूर्वी पडलेला पाऊस यासारख्या प्रतिकूल हवामानामुळे (Weather) उत्पादकता घटल्याचे बोलले जात आहे. व्यापारी जगतात यावर्षी १०० दशलक्ष टन उत्पादन होण्यावर कुणाचाच विश्‍वास नाही. त्यातच मागील वर्षात अतिरिक्त गहू निर्यात झाल्यामुळे देशातील साठ्यामध्ये तेवढी घट झाली आहे. त्यामुळे एकंदर पुरवठ्याचा चित्र दाखवले जाते तेवढे आश्‍वासक नाही. आज इजिप्त सारखा मोठा गहू आयातदार (Wheat Import) देश भारतात पाहणी करून आपली अन्नसुरक्षा निश्‍चित करून ठेवत आहे. तर इंडोनेशियाने भारतातील शेतीमाल आयातीवरील बंदी केवळ १०-१५ दिवसांत उठवली. त्याव्यतिरिक्त अजून १३-१४ देश भारतातून मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्याचे नियोजन करत आहेत.

त्यामुळे भारताचे गहू निर्यातीचे ( Wheat Export) उद्दिष्ट सहज गाठले जाईल, यात शंका वाटत नाही. परंतु देशांतर्गत परिस्थितीमध्ये अजून सहा-आठ महिन्यांनी येणारा बदल कदाचित महागाईला पूरक असू शकेल. त्यातच ८० कोटी जनतेला विनामूल्य गहू पुरवण्याची पंतप्रधान गरीब कल्याण योजना सप्टेंबरपर्यंत वाढवल्यामुळे सरकारी साठ्यामध्ये १० दशलक्ष टन एवढी घट येणारच आहे. पुढील हंगामामध्ये मोसमी पावसाची प्राथमिक अनुमाने सुरवातीला चांगली होती ती आता चिंताजनक होत चालली आहेत. भारतीय हवामान विभागाने (Indian Weather Department) सामान्य पाऊसमानाची शक्यता ४० टक्के दाखवली आहे. तर गुजरात, राजस्थानच्या काही भागात कमी पाऊस असेल अशी अनुमाने आहेत. थोडक्यात पुढील वर्षी भारतात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईलच, याची शाश्‍वती आता देता येणे कठीण आहे. जागतिक बाजारात युक्रेनमधून होणारा गहू, मका, सूर्यफूल (Wheat, Maize, Sunflower) यांसारख्या शेतीमालांचा पुरवठा पुढील एक-दोन हंगाम तरी सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. कारण रशियाने युक्रेनमधील जमिनीची प्रचंड ‘भाजावळ’ करून ठेवली आहे.

सावध पवित्रा हवा
एकंदरीत ढोबळ मानाने विचार करता गव्हाचे मागणी-पुरवठा समीकरण पुढील काळात ‘टाइट’ होत जाणार, हे आताच दिसू लागले आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाच्या गव्हाचे साठे करण्याकडे कल वाढू लागला आहे. यातून शेतकऱ्यांनीही बोध घेण्याची गरज आहे. न जाणो कदाचित सोयाबीन, मोहरी किंवा कापसाप्रमाणे (Cotton) गहू हा पुढील काळात मौल्यवान कमोडिटी ठरला तर? युद्धवर्षामध्ये अन्नसुरक्षेसाठी अतिरिक्त धान्यसाठा करण्याकडे सर्व देश लक्ष देत असताना आपण आपली कोठारे जगासाठी खुली करताना सावधगिरी दाखवण्याची गरज आहे. तसेच इंडोनेशिया सारखा देश पाम तेलावर जगाला नाचवत असताना आपण गहू, तांदळासारख्या (Rice) कमोडिटीजचा वापर निदान खाद्यतेलावरील वाढलेल्या खर्चाची अधिकाधिक भरपाई करण्याच्या दृष्टीने करायची दक्षता तरी निश्‍चितच घ्यायला हवी. जग खनिजतेल, गॅस शिवाय राहू शकेल पण अन्नाशिवाय नाही या कोरोना काळात मिळालेल्या धड्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे.

कमोडिटी मार्केटचा मागील सात ते दहा वर्षांतील इतिहास तपासला तरी दिसून येईल की शेतीसाठी अजूनही पावसावर अवलंबून असलेल्या भारतात एक-दोन हंगाम दुष्काळसदृश्य गेले तर गहू, कडधान्य आणि खाद्यतेलाची भीषण परिस्थिती होते. आधी अनुदान देऊन साखर, (Sugar) गहू निर्यात केला आणि नंतर दुप्पट भावाने त्यांची आयात करावी लागली, असे घडलेले आहे. त्या त्या वर्षांमध्ये ‘सुपर इन्फ्लेशन’ नसल्यामुळे आपण निभावून नेले. परंतु या वेळची महागाई सर्वच क्षेत्रामध्ये असून त्यात आता उच्च मध्यमवर्ग देखील धुपाटून जाताना दिसत आहे त्यामुळे सावध पावले टाकत आणि पुढे वाढून ठेवलेल्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून कृषी निर्यात धोरण आखण्याची गरज आहे. जगाच्या अन्नसुरक्षेचा ठेका पार पडताना देशातील असंख्य गरीब आणि मध्यमवर्गीयांना अन्नासाठी दाहीदिशा फिरण्याची पाळी वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्यायलाच हवी.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com