सौर पंपाच्या अनुदानासाठी कोण अर्ज करू शकतं?

२०१९ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पीएम कुसुम योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जाते.
सौर पंपाच्या अनुदानासाठी कोण अर्ज करू शकतं?
PM Kusum Solar PumpAgrowon

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट (Farmer Income) करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचन आणि वीज (Water And Electricity) निर्मितीसाठी पीएम कुसुम योजना (PM Kusum Scheme) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंपासाठी (Solar Pump) अनुदान दिले जाते.

अनुदान कसं मिळतं?

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना सौर उर्जेसाठी ३०-३० टक्के अनुदान देते. शेतकरी सौर पंपावरील खर्चामध्ये बचत करू शकतात. त्यासाठी नाबार्ड, बँक किंवा इतर संस्थाकडून शेतकरी ३० टक्के कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे सौर पंपासाठी शेतकऱ्यांना एकूण रक्कमेच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल. ज्यामुळे ४० टक्के खर्चात शेतकऱ्यांची बचत होऊ शकते. सौर पॅनलवर तयार होणाऱ्या विजेची विक्रीही शेतकरी करू शकतात.

अर्ज कोण करू शकतं ?

पीएम कुसुम योजनेसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत मोठे शेतकरीही अर्ज करू शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने ठरवलेलं निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्जदार भारतीय नागरिक असावा. त्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतचा सौरपंप शेतकऱ्यांना मिळवता येतो. शेतकरी त्यांच्या गरजेनुसार महामंडळाने जाहीर केलेल्या क्षमतेच्या सौर पंपासाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारच्या या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड, रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खात्याचे तपशील देणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली असावी. तसेच अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. कारण सौर पंपासाठीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com