Vikas Godge: हॅपी न्यू इयर म्हणता म्हणता हातात नुसतं बंबुरं राहील...

वर्ष मोजुन काही उपयोग नसतो. महिने आणि दिवस मोजावे लागतात. आपला प्रत्येक दिवस कसा जातो, आपण आपल्या प्रत्येक दिवसात आपल्या स्वतःचा किती वेळा विचार करतो आणि आपल्या मधे काय व्हॅल्यू ऍड करतो हे तरुणांनी पण आणि मध्यमवयीन लोकांनी पण चेक करुन बघायला हवं.
Life | New Year Resolutions 2023
Life | New Year Resolutions 2023 Agrowon

लेखक- विकास गोडगे

हॅप्पी न्यू ईयर (Happy New Year) कोणे ऐके काळी बिनखर्चिक असायचे. चाळी शेजारुन गेलेली चपटी डांबरी सडक चुन्याने रंगवली कि झालं. मग मराठीत "नववर्षाभिनंदन" इंग्रजीत , Happy New Year 1996" वगैरे लिहुन खांबाच्या लायटीत त्याच्याकडं तिन तिनदा बघत रहायचं. सकाळी लोकांनी बघितल्यावर आपल्या तरुण मंडळाचा वट्ट वाढेल हा आत्मविश्वास असायचा.

पण त्यावेळी माहीत नसतं कि त्यामुळे वट्ट वाढत नसतो तर मनातल्या मनात लोक आपल्याला च्युत्या म्हणत असतात. झालं, चुन्याचाच तेवढा खर्च. तेवढ्याच खर्चावर अख्खंच्या आख्खं हॅप्पी न्यू इयर व्हायचं. टीव्हीवर कविता लाडला बघायला भारी वाटायचं. तेव्हा कविता लाड ही माझ्यासाठी सौंदर्याचा बेंचमार्क होती. तिनं कुणा बरोबर लग्न केलं असेल असल्या अनप्रॉडक्टीव प्रश्नाने मला खुप दिवस छळलं होतं. बरं झालं त्यावेळी ईंटरनेट नव्हतं नाहीतर ते माहीत होऊन माझा तिच्यातला ईंटरेस्ट कमी झाला असता. आयुष्यात काही गोष्टींची फक्त झलकंच भेटते त्यामुळे त्या आकर्षक, मोहक आणि इंटरेस्टिंग वाटतात. जसं पाटलाची पिंकी दिवसभर मी तिच्या घरासमोरील दुकानात बसल्यावर संध्याकाळी एकदाच खिडकीतून बघायची तेव्हा मिळणारा आनंद ती मला भेटल्यावर राहीला नसता तसं.

तर विषय पाटलाच्या पिंकीचा नाही किंवा कविता लाडचा पण नाही. तर विषय आहे हॅप्पी न्यू ईयरचा.

हॅप्पी न्यू ईयर म्हणत म्हणत वर्षेच्या वर्षे अशीच्या अशी आयुष्यातुन निघुन जातात आणि जेव्हा कधी हिशोब करायला बसाल तेव्हा आपल्या हातात बंबुरं राहीलं हे लक्षात येतं आणि "हात घालिन तिथुन पाणी काढीन" असा असलेला आत्मविश्वास, आता पोटासाठी कायतरी करायला पाहिजे हितपर्यंत येऊन ठेपतो.

आपल्या बरोबरचे काही मित्र पुढे गेले आपण ज्यांना हिनवत होतो ते कुठंतरी चिटकुन राहीले आता सेटल झाले, आपण जिच्यावर लाईन मारत होतो ती आता तिच्या नवऱ्या बरोबर आणि दूर्वांश, वेदांश बरोबर कारच्या शेजारी ऊभा राहुन फोटो टाकत असते आणि आपण तिच्या फोटोला बदाम हानुन तोंडातली तंबाखू उचव्या बोटानं काढुन टाकुन देत जग लय मादरचोद आहे म्हणून मनातल्या मनात शिव्या देत असतो.

वर्ष मोजुन काही उपयोग नसतो. महिणे आणि दिवस मोजावे लागतात. आपला प्रत्येक दिवस कसा जातो, आपण आपल्या प्रत्येक दिवसात आपल्या स्वताचा किती वेळा विचार करतो आणि आपल्या मधे काय व्हॅल्यू ऍड करतो हे तरुणांनी पण आणि मध्यमवयीन लोकांनी पण चेक करुन बघायला हवं.

Life | New Year Resolutions 2023
Cotton Rate : आठवडाभरात कसा राहीला कापूस बाजार?

जर डिग्री मधे आपलं शिक्षणावर लक्ष नसेल, कॉलेजात जाऊन काय होतंय शिक्षक च्युते आहेत असं आपल्याला वाटत असेल तर "you are in deep shit " जर कॉलेज सुटुन पण आजुन खुप वेळ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर किंवा आजुन घरुन पैसे मागवत असाल किंवा घरी बसुन बापाच्या भाकरी मोडत असाल तर "you don't know but you are in deep shit "

केली तर भारीच नोकरी करीन असली नोकरी मी करत नसतो असं म्हणत असाल तर भारी नोकरी मिळेस्तोवर तिशी येत असते आणि मग सुरुवात बारक्या चिरक्या नोकरीतुनच करावी लागते.

लक्षात घ्या कोणत्याही क्षेत्रात करीयर करायला मन लाऊन घासलं तर दहा वर्षे लागतात. मन लाऊन नाही घासलं तर कधीच करीयर होत नाही. माझ्याकडे पन्नास आणि पंच्चावन वर्षाचे लोक पण येतात अगदी MBA झालेले पण करीयरची आयमाय एक झालेली असते आणि कुठंच नीट काम केलेलं नसतं. त्यावेळी इंटरव्ह्यू पेक्षा वैयक्तिक मला नोकरीची किती गरज आहे मुलगा शिकतोय, मुलगी शिकतेय,घरी मी एकटाच कमवता आहे, असं ऐकलं कि आपल्याच अंगावर काटा येतो.

आसपास भवताली बघितलं तर समजेल कि चांगलं उच्च शिक्षण म्हणजे इंजिनिअरींग MBA केलेल्या पैकी फक्त 50% लोकंच करीयर करु शकतात. त्यातील फक्त 3% लोकंच आयुष्यात उच्च पदावर पोचतात. त्या तीन टक्यांचा भाग होण्यासाठी काय करायचं. हां खुप मोठा प्रश्न आहे. आणि तो एका पोस्टमध्ये शक्य नाही.

तुर्तास वेळ गेलेली नाही पण आजुन दोस्तांबरोबर वेळ घालवण्यापेक्षा गेल्या वर्षाचा नाही तर गेल्या अनेक वर्षाचा विचार करा, हातुन काय सुटलं ते महत्वाचं नाही आजुन आपण लाथ घालीन तिथं पाणी काढु शकतो पण पाणी एका दिवसात निघत नसतं समजुन कामाला लागा. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना तहे दिलसे शुभेच्छा आहेतंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com