Millet Production : भरडधान्याचे उत्पादन वाढविणे का आहे गरजेचे?

भरडधान्याची लागवड वाढविण्यासाठी भरडधान्याचा आहारातील समावेश वाढविने गरजेचे आहे.
Nutri Cereals or Millets
Nutri Cereals or MilletsAgrowon

संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक अन्न आणि शेती संस्था यांना भारत सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (मिलेट्स वर्ष) म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (Millet Year) म्हणून घोषीत केले. केंद्र सरकार देशभरात भरडधान्य लागवडीला प्रोत्साहन देत आहे. मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून भरडधान्यांकडे बघितले जाते. त्यामुळे भरडधान्यांना सुपरफूड म्हटले जाते. शुष्क प्रदेशात किंवा कोरडवाहू प्रदेशातही भरडधान्यांची लागवड शक्य आहे. भारतीय लोकांच्या आहारात मुख्यतः तांदूळ आणि गव्हापासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे भरडधान्याचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. भरडधान्याची लागवड वाढविण्यासाठी भरडधान्याचा आहारातील समावेश वाढविने गरजेचे आहे.

Nutri Cereals or Millets
पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग

जे आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.भरडधान्याचे महत्त्व आपल्याकडे परंपरेनुसार आहारात विविध प्रकारचे धान्य वापरतात. यामध्ये गहू, तांदूळ या रोजच्या धान्याबरोबरच ज्वारी, नाचणी, मका, बाजरी अशा भरड धान्यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे आहारात विविधता राखली जाते. परंतु बदलता जीवनक्रम आणि फास्ट फूडच्या नादात संतुलित आहारास महत्त्व न देता जसा आवडेल तसा आहार घेतल्यामुळे आपल्या रोजच्या आहारातून जाड्याभरड्या धान्याचा वापर कमी होत चालला आहे. ज्वारी, बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ग्रेटर मिलेट म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटॉप ही सर्व मायनर मिलेट किंवा बारीक धान्ये म्हणून ओळखली जातात.

Nutri Cereals or Millets
Black Wheat : काळा गहू पोषक का आहे?

राळा, नाचणी, वरी या भरड धान्याचे विविध प्रकार अढळतात. भरडधान्यामध्ये ग्लुटेन नाही. मात्र प्रथिने, तंतुमय घटक जास्त आहेत. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. नाचणी सारखे धान्य लहान मुले ते वृद्ध यांना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. या धान्यामध्ये जीवनसत्त्व-ड, कॅल्शिअम आहे. राळ्यामध्ये जीवनसत्त्व बी १ आहे जे मज्जातंतुशी निगडित आजारावर गुणकारी आहे. बाजरी उष्ण गुणाची आणि लोह पुरवणारी अशी आहे. वरईमध्ये कमी कॅलरी आहेत, त्यामुळे स्थूलता कमी करण्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य देशामध्ये भरडधान्ये खाण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतातील भरडधान्य उत्पादक राज्ये कोणती ?जगभरातील १३० देशातील ५०० मिलीयन पेक्षा जास्त लोकांच्या आहारात पारंपारिक पदार्थांतून भरडधान्याचा समावेश होतो. सन २०२० - २१ च्या आकडेवाडीनूसार महाराष्ट्रात ४.२४ मिलीयन हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड होते. तर उत्पादन ४.७८ मिलीयन टन होते. ७.७५ मिलीयन हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होते. तर उत्पादन १०.८६ मिलीयन टन उत्पादन मिळते.   

भारतात ज्वारी, बाजरी यासारख्या मुख्य भरडधान्य व्यतिरिक्त राळा, बर्टी, नाचणी, वरई, ब्राऊन टॉप, कोदोमिलेट यासारख्या दुय्यम भरड धान्याचेही उत्पादन होते. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू काश्मीर, हरयाना, उत्तरप्रदेश, राजस्थान ही प्रमुख बाजरी उत्पादक राज्ये आहेत तर महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यामध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारी, बाजरी या मुख्य भरडधान्याव्यतिरिक्त नाचणीचे उत्पादन घेणाऱ्या राज्याचे प्रमाण जास्त आहे.

फींगरमिलेट म्हणजेच नाचणी किंवा नागलीचे उत्पादन हे मेघालय, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, ओडीशा आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये घेतले जाते. मेघायल आणि कर्नाटक राज्यात फॉक्सटेल म्हणजे राळा या भरड धान्याचे उत्पादन घेतले जाते. बार्नयार्ड मिलेट म्हणजे बर्टी या भरडधान्याचे उत्पादन उत्तराखंड, ओडीशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये होते. ब्राऊनटॉप मिलेट्स चे उत्पादन फक्त कर्नाटक राज्यामध्ये घेतले जाते. लिटलमिलेट मध्ये विविध प्रकारच्या बारिक भरडधान्याचा समावेश होतो. या धान्याचे उत्पादन ओडीशा, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये घेतले जाते. कोदोमिलेट चे उत्पादन ओडीशा, मध्यप्रदेश राज्यात घेतले जाते.  प्रोसो मिलेट म्हणजे वरई. वरईचे उत्पादन मुख्यत: आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड राज्यात होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com