Vegetable Crop : वेलवर्गीय भाज्यांसाठी मंडप किंवा ताटी पद्धत फायदेशीर का आहे?

कारले, दुधी भोपळा, दोडका,घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.
Vegetable Crop
Vegetable CropAgrowon

वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारले (Bittergourd), दुधी भोपळा, दोडका (Ridgeguard) व घोसाळी या भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियाणांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलींना वळण देणे व आधार देणे ही कामे महत्त्वाची आहेत.

दर्जेदार अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा  तारेच्या ताटीने आधार द्यावा.कारले, दुधी भोपळा, दोडका,घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते. 

आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत 

वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून चार ते सहा फूट उंचीवर वाढतात.त्यामुळे पाणी आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागत नाही.त्यामुळे ते सडत नाहीत तसंच खीर व रोगांचे प्रमाण कमी राहत.

फळे लोंबकळती  राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते.हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.

Vegetable Crop
Musterd Crop : महाराष्ट्रातही मोहरीचे पीक फायदेशीर का आहे?

फळांची तोडणी कीडनाशके फवारण्याची कामे सुलभ होतात.दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होत असल्याचे प्रयोगातून दिसून आले आहे.

याशिवाय फळांचा एक सारखा आकार त्यावरील बारीक लव इजा न होता तशीच राहिल्यामुळे फळे ताजीतवानी दिसतात.मंडपावर वेली सहा ते सात महिने चांगल्या राहतात.तर जमिनीवर लवकरच खराब होतात किंवा जास्त काळ टिकत राहतात.

मंडप पद्धतीमुळे कीडनाशकांची फवारणी चांगल्या प्रकारे करता येते.दुधी भोपळा मंडपावर घ्यायचा असेल तर महिको वदर,सम्राट किंवा त्यासारख्या दंडगोल आकाराच्या मंडपावर घेऊ नयेत.कारली,दोडका व घोसाळी या पिकांना पाटी पद्धत वापरणे सोयीस्कर ठरते. 

वेलवर्गीय पिकांना पाण्याचा ताण देऊ नये तसेच वेलींना वळण व  आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी.वरखताच्या मात्रा द्याव्यात.रोग व कीड आटोक्यात ठेवण्यासाठी वेळच्यावेळी उपाययोजना कराव्यात.फळांची कारणी योग्यवेळी करावी. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळेल. 

Vegetable Crop
Rajma Crop : राजमा पीक का आहे फायदेशीर?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com