Farmpond : शेततळ्याला आस्तरिकरण करण्याची गरज का आहे?

अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.
Farmpond
Farmpond Agrowon

पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाआभावी पिकास ताण पडतो, अशावेळी या तळ्यात साठलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) पद्धतीने पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेततळे खोदले जाते. मात्र शेततळे (Farmpond) खोदल्यानंतर त्यामध्ये आस्तरिकरण केले जात नाही. 

अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो. शेततळ्यासाठी अस्तर ज्या जमिनीत पाणी धरून  ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे.

तसेच पाणी पाझरण्याचा वेगही प्रचंड आहे. तेथे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरलेले शेततळे काही दिवसांत कोरडे होते. पर्यायाने अशा शेततळ्यातून अपेक्षित फायदा होत नाही.  याशिवाय शेतततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.

Farmpond
Desi Cow : शास्त्रीय पद्धतीने देशी गोसंवर्धन करण्याची गरज

शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जाऊ नये.यासाठी विशेष प्रकारच्या ५०० मायक्रॉन दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर करावा.  

प्लॅस्टिकचे कापड शेततळ्यात पसरताना मुरमाची किंवा मातीची अणकुचीदार टोके वर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याकरिता सुक्या मातीचे किंवा वाळूचे थर पसरावेत. त्यावर प्लॅस्टिकचे कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावे.

Farmpond
Millets : भरडधान्यावर प्रक्रिया करण्याची गरज का आहे?

अस्तरीकरणासाठी वापरण्यात येणारा प्लॅस्टिक कागद आयएसआय माणक प्रमाणे असावा. बांधापासून तळ्याच्या सर्व बाजूने १.५ बाय १.५ बाय १.५ चा चर खेदून घ्यावा. त्यात लायनिंग ची वरिल बाजू गाडून टाकता येते. याला अॅकरिंग म्हणतात.

यामुळे लायनिंग ची हालचालयामुळे लायनिंग ची हालचाल होत नाही व ते जास्त काळ टिकण्यास मदत होते. शेततळ्याला कुंपण घालणे अत्यावश्यक आहे. कुंपण नसल्यास वन्य प्राण तलावात शिरण्याचा व अपघात होण्याचा धोका असतो. 

खोदाई पूर्ण झाल्यावर शेततळ्यातील साफसफाई व प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणास योग्य तळ,सर्व बाजू उतार व माथा इत्यादींचे ड्रेसिंग, फिनिशिंग करावे.

पाण्याच्या वजनामुळे प्लॅस्टिक फिल्म खाली घसरणार नाही याची काळजी घ्यावी.त्यासाठी फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद करून संपूर्ण शेततळ्यात बसवावी. फिल्ममुळे शेततळ्यात साठवलेले पाणी जमिनीमध्ये मुरत नाही.

शेततळे तयार झाल्यानंतर बऱ्याचदा जनावरे कापड चावून खराब करतात. तसेच गाई किंवा म्हशींसुद्धा शेततळ्यात पडण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी शेततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करावे.

Farmpond
Ginger Market : आल्यावर प्रक्रिया करण्याची गरज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com