Fardad Kapashi : फरदड कपाशी का घेऊ नये?

बरेचशे शेतकरी कपाशीची फरदड घेत आहेत. फरदड घेतल्यामुळे काय होतं? आणि पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावं? याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.
Fardad Kapashi
Fardad KapashiAgrowon

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत मागील दोन आठवडया पासून मराठवाड्यातील विविध तालुक्यांना प्रक्षेत्र भेटी दिल्या. यामध्ये विविध ठिकाणच्या कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के च्या दरम्यान दिसून आला. पुढील काळातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण बरेचशे शेतकरी कपाशीची फरदड घेत आहेत. फरदड घेतल्यामुळे काय होतं? आणि पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावं? याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

Fardad Kapashi
फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये : आळसे

यंदाच्या लांबलेल्या पावसामुळे मराठवाडयातील बऱ्याच भागात विहिरी, कुपनलिका आणि कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. कापसाला चांगला उठाव असल्याने कपाशीचे पीक काढण्या ऐवजी पाणी, खताच्या मात्रा देउन कपाशीचा पुर्णबहार म्हणजेच फरदड घेण्यावर शेतक-यांचा कल दिसुन येत आहे.  फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खतं, कीटकनाशकं यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते.

कपाशी वेचणीनंतर रब्बी नंतरच्या हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायदयाची वाटते. मात्र, या पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचं शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. 

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावं?

कपाशीची फरदड घेउ नये. वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यावर ताबडतोब प-हाटीचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ प-हाटी रचुन ठेवू नये. कारण पऱ्हाटीत गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात. रोटोवेटर ऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने प-हाटीचा बारीक चुरा करुन कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा. जिनींग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळयाचा वापर करावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com