Wild Vegetable : शाश्वत आरोग्यासाठी रानभाज्या

पावसाळी हंगामामध्ये सहज नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर, मोकळ्या रानावर, डोंगराळ टेकड्यांवर, पडीक जमिनीमध्ये रानभाज्या उपलब्ध होतात.
Wild Vegetable
Wild Vegetable Agrowon

डॉ.प्रणिता कडू (काकडे)

पावसाळी हंगामामध्ये (Rainy Season) सहज नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर, मोकळ्या रानावर, डोंगराळ टेकड्यांवर, पडीक जमिनीमध्ये रानभाज्या (Wild Vegetable) उपलब्ध होतात. यातील काही भाज्या (Vegetables) विविध जीवनसत्त्वे, खनिजांनी समृध्द आहेत. या रानभाज्यांमध्ये कुठलेही खत (Fertilizer) कीडनाशकांचा (Pesticide) वापर न झाल्यामुळे त्यांच्यामधील नैसर्गिक चव व पोषण तत्त्व स्थिर राहतात.

तरोटा

स्थानिक नाव : तरोटा, तरवटा, टाकळा

उपयुक्तता :

१) पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो.

२) चर्मरोगावर उपयुक्त आहे. ओली-कोरडी खरूज अंगात उठणारे कंड तसेच लहान गाठी यामुळे बऱ्या होतात.

३) लिंबाच्या रसातून बिया वापरण्याचा प्रघात आहे.

४) पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर देतात.

५) पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.

६) त्वचा जाड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग करतात.

७) पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

कुंजर

स्थानिक नाव : कुंजर

उपयुक्तता :

१) भाजी, पौष्टिक व पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते.

२) गर्भाचे नीट पोषण करून गर्भपात होण्याचे टाळते.

३) पित्त, रक्त विकार, मूळव्याध या विकारांवर गुणकारी आहे.

केना

स्थानिक नाव : केना

उपयुक्तता :

१) भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते.

२) त्वचाविकार, सूज हे विकार कमी होतात.

३) भाजीमुळे लघवी साफ होण्यास मदत होते.

Wild Vegetable
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुळवेल

स्थानिक नाव : गुळवेल, गरुडवेल, अमृत वेल

उपयुक्तता :

- कंद, पाने व खोडाचा वापर औषधी होतो. सत्त्व व काढा वापरतात.

- कटुपौष्टीक, पित्तसारक, संग्राहक, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्म.

- नेत्रविकार, वमन विकार, सर्दी, मूत्रविकार इत्यादींवर उपयुक्त.

- ताप, तहान, जळजळ, वांतीवर उपयुक्त.

- रक्तसुधारक असून पित्तवृध्दीच्या कावीळामध्ये गुणकारी, त्वचारोगात उपयोगी.

- मधुमेह व वारंवार मुत्रवेग, वातरक्त विकारात उपयुक्त.

अळू

स्थानिक नाव : धोपा, चमकुरा, अळू, डोडा

उपयुक्तता :

-पानामध्ये विपुल प्रमाणात कॅरोटीन असते.कॅल्शिअम व लोह आहे.

- अळुचा रस जखमेवर चोळल्याने रक्त वाहिन्या बंद होऊन जखम लवकर भरते.

- पानाचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठीवर लेप केल्यास आराम पडतो.

Wild Vegetable
रानभाज्या, तणभाज्यांचे सेवन आरोग्यवर्धक : मोरे

अंबाडी

स्थानिक नाव : अंबाडी

उपयुक्तता :

- पित्त बाहेर काढण्यासाठी उपयुक्त

- सर्व प्रकारच्या वाताचे समूळ उच्चाटन करण्यासाठी

- उदर विकारासाठी उपयुक्त.

- लोहवर्धक असून रक्तक्षयावर उपयुक्त.

घोळ

स्थानिक नाव : घोळ

उपयुक्तता :

- भाजी चवीने थोडी आंबट असल्याने जेवणात रुची निर्माण करते.

- आतड्यातील श्लेष्मल त्वचा यामुळे बळकट होते.

- अल्सर होत नाही, मधुमेह कमी होतो.

-भाजी शीतल, रक्तशोधक, व सूज कमी करणारी आहे.

- मूळव्याधीवर गुणकारी.

- भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयोगी.

-वाढलेला कफ व पित्तदोष कमी होऊन आतड्यांची हालचाल वाढते.पोट साफ होते.

आघाडा

स्थानिक नाव : आघाडा

उपयुक्तता :

- पित्त झाल्यास आघाड्याचे बी ताकात भिजवून बारीक करून दिल्यास आराम पडतो.

- त्वचा विकार,मूत्र विकार, रातांधळेपणा, कावीळ, खोकला इ. रोगांवर उपयुक्त.

- दात दुखत असल्यास ४ ते ५ पाने चावून खाल्ल्यास आराम पडतो.

- झाडाची राख मधात दिल्यास खोकला, कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडतो.

-कॅल्शियमयुक्त असल्याने याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

- मधुमेह, विषमज्वरावर औषध म्हणून उपयुक्त.

संपर्क ः

डॉ.प्रणिता कडू (काकडे), ८६०५३०८९१३

(गृहविज्ञान विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र ,घातखेड जि.अमरावती)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com