देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई  : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (ता.१) निवड झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन करत श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या वेळी शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्र्यांना आता थेट विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत शिरावे लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबरला अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती; परंतु अजित पवार यांचे बंड शांत होत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमताअभावी फडणवीस सरकार कोसळले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महापालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ आणि १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौरपद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’चा मान मिळविणारे ते पहिले व्यक्ती होत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com