agrowon agri News marathi pankaja mundes post to reflect emotional appeal beed maharashtra | Agrowon

पंकजा मुंडेंची पोस्ट समर्थकांना केवळ भावनिक आवाहन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मी  भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. माझ्या वडिलांची १२ डिसेंबरला जयंती असते. त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांशी संवाद साधते. दर वर्षीप्रमाणं मी त्यांना गोपीनाथगडावर येण्याचं आवाहन केलं होतं. पण, काही माध्यमांनी फेसबुक पोस्टचा विपर्यास केला आणि मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळं मी व्यथित झाले.
- पंकजा मुंडे, भाजप नेत्या

बीड : माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख, याचा माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ निघत आहे. परंतु, ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ समर्थकांना केलेले भावनिक आवाहन असून, त्या कुठलीही वेगळी राजकीय भूमिका घेतील असे नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 

पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून चुलतबंधू धनंजय मुंडे यांच्याकडून ३० हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर पराभव स्वीकारत जबाबदारीही स्वत:वर घेतली. परंतु, अद्याप त्या जिल्ह्यात किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. त्यातच तीन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली आणि पोस्टमधील काही शब्दांमुळे त्या पक्षांतर करतील, भाजपमध्ये नाराज अशा विविध चर्चा आणि बातम्या सुरू झाल्या.  परंतु, गुरुवारी (ता. १२) दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असून, त्यानिमित्त समर्थकांना गोपीनाथगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी पोस्ट लिहिलेली आहे.

तशा, त्या भाजपमध्ये काही प्रमाणात नाराज असल्या तरी विद्यमान परिस्थिती पाहता इतर पक्षात त्यांना त्यांच्यायोग्य जागा मिळेल का, असाही प्रश्न आहे. तसेच त्यांच्या वडिलांनी ज्या पक्षात हयात घालविली तो पक्ष त्या कसा सोडतील, असाही प्रश्न आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्यांच्या शब्दांना भावनिक झालर असल्याने वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्या भावनिक राजकारण करतात, असा विरोधकांचा आरोप आणि आपण भावनेने राजकारण करतो, असा पंकजा मुंडे यांचा दावा राहिला आहे. त्यामुळे ही पोस्टदेखील तशीच काहीशी आहे.

‘वेगळा विचार निव्वळ अफवा’
भाजपच्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे वेगळा विचार करीत आहेत, ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.
 
 


इतर ताज्या घडामोडी
कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलननाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी...
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः...बुलडाणा  : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या...
...अखेर जायकवाडीतून रब्बी सिंचनासाठी...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पावरून कालव्या‌द्वारे...
अकरा महिन्यांनंतर पिकांची नुकसानभरपाईपुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव...
सांगलीत आडसाली उसाला महापुराचा फटकासांगली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात एक लाख...बीड : यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड या...
परभणी येथे दूध संकलनातील घट सुरूचपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत परभणी येथील दुग्ध...
सातारा : ‘शेतकरी सन्मान’चा निधी मिळालाच...सातारा ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत निर्बंधमुक्ती...नांदेड, परभणी, हिंगोली ः शेतकरी संघटनेतर्फे शरद...
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री...सोलापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी...
घरात बसणार नाही, राज्यभर दौरा काढणार ः...परळी, जि. बीड : ‘‘बंड केले नसते तर देशाला...
खातेदारांच्या नोंदीसाठी ‘ई-हक्क’ प्रणालीनगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-...
सर्वसामान्य, तरुण पिढीशी माझी बांधीलकी...मुंबई ः आपली बांधीलकी सर्वसामान्य माणसाशी,...
पीकविमा योजनेत कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये...अकोला ः गेल्या काही वर्षांत प्रत्येक हंगामातील...
शेतकऱ्यांना अपेक्षित राज्य कारभार करेन...शिवनेरी, जि. पुणे : शिवरायांच्या महाराष्ट्राचा...
निर्यातक्षम द्राक्षनोंदणीला मुदतवाढनाशिक : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ''...
हळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...