agrowon agri news marathi shekhar gaikwad take a temporary charge as agriculture commissioner pune maharashtra | Agrowon

शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्त

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी नियोजन अशा विविध आघाड्यांवर गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असलेले कृषी आयुक्त सुहास दिवसे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाची तात्पुरती सूत्रे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे आली आहेत. 

पुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी नियोजन अशा विविध आघाड्यांवर गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असलेले कृषी आयुक्त सुहास दिवसे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाची तात्पुरती सूत्रे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे आली आहेत. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. वेळापत्रकानुसार प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी असल्यामुळे कृषी आयुक्तांना मसुरी येथे जावे लागत आहे. मात्र, त्यामुळे पीकविमा किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवर परिणाम होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

श्री. गायकवाड यांनी कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार नुकताच स्वीकारला. तत्पूर्वी श्री. दिवसे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते.  कृषी खात्यात कामाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेक सनदी अधिकारी नामोहरम होतात. यापूर्वी सुनील केंद्रेकर यांना ९० दिवसांत, तर सच्चिंद्र प्रताप सिंह यांना दीड वर्षात आयुक्तपद सोडावे लागले होते. श्री. दिवसे यांनी मात्र पदभार घेतल्यानंतर कृषी खात्यात अनेक सुधारणा घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. १९९२ मध्ये त्यांची कृषिसेवा वर्ग दोन आणि वित्त लेखाधिकारीपदी निवड झाली. १९९३ मध्ये ते उपजिल्हाधिकारी बनले आणि २००९ मध्ये त्यांची आयएएस श्रेणीत निवड झाली.  पीकविमा योजनेची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी श्री. दिवसे व्यक्तिशः लक्ष घालत असल्यामुळे बॅंका आणि विमा कंपन्यांनी कामकाजात बदल केला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...