agrowon agri news marathi state government gives ordered to cancel offence of agitators mumbai maharashtra | Agrowon

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई  ः नाणार येथील हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. या आदेशामुळे प्रकल्पाच्या विरोधात लढलेल्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई  ः नाणार येथील हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. या आदेशामुळे प्रकल्पाच्या विरोधात लढलेल्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी श्री. ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना श्री. ठाकरे यांनी नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचे आदेश गृह खात्याला दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित नाणार हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. मात्र, या विरोधाला न जुमानता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प रेटला होता. शिवसेनेने स्थानिकांच्या बाजूने उभे राहत नाणार विरोधात आंदोलनात उडी घेतली. शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन श्री. फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्प मागे घेतल्याचे जाहीर केले. याशिवाय मार्च २०१८ मध्ये त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन संघर्ष समितीला दिले होते. मात्र, या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नव्हती.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...