agrowon marathi special article on NCDEX and MCX Market rates | Agrowon

कापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 30 मार्च 2018

गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले होते.  याही सप्ताहात हरभरा वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.
 

गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले होते.  याही सप्ताहात हरभरा वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.
 

सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्यूचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव  (रु. ३,८६६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.३ टक्क्यांनी अधिक  (रु. ४,१८२) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ६.८ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००).  हरभऱ्याचे भाव जूनमध्ये १.६ टक्क्याने अधिक असतील (रु. ३,७८४). मात्र, रबी मक्याचे भाव जूनमध्ये ११.४ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,१७४).

गेल्या सप्ताहातील एसीडीईएक्स आणि एससीएक्समधील किमतीतील चढउतार ः

मका
रब्बी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती या सप्ताहात रु. १,२२६ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,३२५ वर आल्या आहेत. जून २०१८  मधील फ्यूचर्स किमती  रु. १,१८४ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५  आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे. 

साखर
साखरेच्या (एप्रिल २०१८) किमती रु. ३,०४१ वर आल्या आहेत.  स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०२६ वर आल्या आहेत.  पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता आहे. जुलै (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. ३,०७८ वर आल्या आहेत.  १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे. 

सोयाबीन  
सोयाबीन फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७२७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १  टक्क्यांनी वाढून रु. ३,७७७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती रु. ३,८६६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्यतेल उद्योगाची मागणी वाढत आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल असा अंदाज आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आफ्रिकेहून आयातसुद्धा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस किमतींत वाढ अपेक्षित नाही.  

हळद
हळदीच्या फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ६,५५६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,६५५ वर घसरल्या आहेत.  जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.७ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ६,८३४).  वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत व  निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.  

गवार बी
गवार बीच्या फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती  रु. ४,१०३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,१२७ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्यूचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१८२).  

हरभरा
फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती ३,७१६ वर आल्या आहेत.  स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,७२४ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७८४).  शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील.  आयात शुल्क ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा खरेदी सुरू होईल. मध्य प्रदेशमध्येसुद्धा शासनाची खरेदी सुरू होईल.  

कापूस 
एससीएक्समधील फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. २०,५२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती  रु. १९,६५८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०००). कपाशीचा एप्रिल २०१८ (सुरेंद्रनगर) डिलिव्हरी भाव ( एनसीडीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ८९९ आहे. आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. (टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठ)
      

इतर अॅग्रोमनी
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...