agrowon marathi special article on village sanitation programme in Jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यातील बारा तालुके हगणदारीमुक्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या शौचालयांच्या निर्मितीचे काम गतीने झाले. मध्यंतरी काही गावांमध्ये ठेकेदारांच्या मनमानी व वाळूसंबंधीच्या अडचणीच्या तक्रारी आल्या. यावर लक्ष देऊन प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. काही ठिकाणी प्रभारी गटविकास अधिकारी असल्यानेही अडचणी आल्या आहेत. 
- नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगाव
 

 राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची मुदत शासनाने दिलेली असताना जिल्ह्यातील १५ पैकी फक्त १२ तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत. मोठ्या तालुक्‍यांमध्ये यासंदर्भात कार्यवाहीला अडचणी येत असून, संबंधित तालुक्‍यांमध्ये प्रशासकीय दृष्ट्या गटविकास अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी असमर्थ ठरल्याचेही समोर आले आहे. 

  सध्या पावसाळा सुरू असल्याने कामे अधिकृतपणे पूर्ण करणे शक्‍य नाही. परंतु तरीही प्रशासनाने ही कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करायच्या सूचना दिल्या आहेत. दोन लाख शौचालयांचे काम पूर्ण करायचा लक्ष्यांक मार्च २०१८ पर्यंत ठेवला होता. परंतु जवळपास २५ हजार शौचालयांचे काम होऊ शकले नाही. जामनेर, चाळीसगाव, जळगाव, अमळनेर येथे कार्यवाही संथ गतीने सुरू होती. एरंडोल, धरणगाव, चोपडा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, रावेर, धरणगाव हे तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत. बोदवड, भडगाव, एरंडोल या लहान तालुक्‍यांमध्ये कामे लवकर पूर्ण करण्यावर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने भर दिला. गतीने कामे केल्याने हे तालुके वेळेत कामे पूर्ण करू शकले. परंतु इतर तालुक्‍यांमध्ये मात्र प्रभारी अधिकारी, ग्रामस्थांचा कमी प्रतिसाद आणि ग्रामसेवकांची कुचराई यामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. 

भुसावळ तालुका मागील वर्षीच हगणदारीमुक्त झाला. या तालुक्‍याचा सन्मान जिल्हा प्रशासनाने केला आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा व स्वछता विभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठांनी शौचालयांच्या कामांबाबत कुचराई करणाऱ्या अधिकारी व वरिष्ठांना तंबी दिली होती. तसा आढावा व्हीसीद्वारे घेतला. यानंतर जवळपास १३८ ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या. संबंधित ग्रामसेवकांची चौकशीही प्रशासनाने प्रस्तावित केली. परंतु नंतर संबंधित ग्रामसेवकांनी कामात सुधारणा केली. 

चाळीसगाव, जामनेर हे तालुके मोठे आहेत. सर्वाधिक कामे याच तालुक्‍यात अपूर्ण आहेत. जामनेरात सुमारे १० हजार तर चाळीसगावातही जवळपास पाच ते सहा हजार कामे अपूर्ण आहेत. तर रावेरातही जवळपास तीन ते चार हजार कामे अपूर्ण आहेत. या महिन्यात ही कामे उरकली जाण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

 

वाळू व निधीची अडचण
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून मागील वर्षी हाती घेतलेल्या कामांसाठी पहिल्या टप्प्याचा साडेतीन हजार रुपये प्रतिशौचालय हा निधी वितरित झाला नाही. तर पूर्ण झालेल्या शौचालयांच्या लाभार्थींनाही १०० टक्के अनुदान मिळालेले नाही. १२ हजारपैकी नऊ हजारच अनुदान काही ग्रामसेवकांनी दिले आहे. तर अनेक ठिकाणी वाळूची अडचण मध्यंतरी निर्माण झाली. एका गावात एका ठेकेदाराला सर्व कामे दिली गेली. त्यात संबंधित ठेकेदाराने मनमानी केली. नंतर वाळूचे कारण सांगितल्याचा प्रकारही उघड झाला आहे. या प्रकाराची माहिती सदस्यांनी मध्यंतरी सर्वसाधारण सभेत दिली होती. परंतु, नंतरही प्रशासनाने ठोस पावले यासंदर्भात उचललेली नसल्याचे चित्र आहे. 

 

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...