agrowon marathi special news regarding agriculture produce marketing. | Agrowon

‘वावर`च्या माध्यमातून जिल्ह्याचा होणार कायापालट
गोपाल हागे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

 शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरिता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाइट यांसारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतीमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

 शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरिता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाइट यांसारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतीमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

नियोजन भवनात ‘वावर’संदर्भात नुकतीच बैठक झाली. या वेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
‘शेतकरी ते ग्राहक’ ही ‘वावर’ची टॅगलाइन आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देऊन आत्महत्यांचे प्रमाण घटविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ‘वावर’चा उपक्रम हाती घेतला आहे,  असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, यासाठी ‘वावर’ नावाने सहकारी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित केले आहे. प्राथमिक स्तरावर ‘वावर’च्या संदर्भातील कामकाज पूर्णत्वास गेले आहे. 

शेतीमालाचे ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग 

वेबसाइट, मोबाईल ॲप, कॉल सेंटर अशा आधुनिक तंत्राची ‘वावर’ला जोड देण्यात आली आहे. याबरोबरीने शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी तरुण होतकरू ५०० शेतकऱ्यांना ई-कार्ट देण्याबरोबरच त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ॲग्रो मॉल, कोल्ड स्टोरेज या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ‘वावर’ या नावाने शेतीमालाचे ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग जिल्हा प्रशासन करणार आहे. ‘वावर’च्या यशस्वितेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.या उपक्रमासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...