agrowon marathi special news regarding grampanchyat | Agrowon

महिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप पडणार महाग
सूर्यकांत नेटके
सोमवार, 2 जुलै 2018

नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता हस्तक्षेप होत आहे. त्याबाबत आता महिला सरपंचाच्या कामात केलेला हस्तक्षेप बाह्यव्यक्तीला महागात पडणार आहे. हस्तक्षेपामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याने आता महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत हस्तक्षेप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव नगर तालुका पंचायत समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे संबंधित सरपंचाचेही हस्तक्षेपाला प्रोत्साहन असल्याचे आढळून आले तर त्या सरपंचावर कारवाई करण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव देणार आहे. तसा ठराव घेणारी नगर ही राज्यातील पहिलीच पंचायत समिती आहे.

नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता हस्तक्षेप होत आहे. त्याबाबत आता महिला सरपंचाच्या कामात केलेला हस्तक्षेप बाह्यव्यक्तीला महागात पडणार आहे. हस्तक्षेपामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याने आता महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत हस्तक्षेप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव नगर तालुका पंचायत समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे संबंधित सरपंचाचेही हस्तक्षेपाला प्रोत्साहन असल्याचे आढळून आले तर त्या सरपंचावर कारवाई करण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव देणार आहे. तसा ठराव घेणारी नगर ही राज्यातील पहिलीच पंचायत समिती आहे. या निर्णयामुळे कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या महिला सरपंचाच्या कुटुंबातील व्यक्तींची अडचण होणार आहे.
आरक्षित जागेनुसार ५० टक्के ग्रामपंचायतीत महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे. काही ठिकाणी खुल्या जागांवरही महिला सरपंचपदी आहेत. मात्र, त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. पती, मुलगा, सासरा, वडील ही मंडळी महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करताना दिसतात. त्यामुळे ग्रामसेवकांसह कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड होते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दबावाला बळी पडून काम करावे लागते. त्यावरून गावपातळीवरील वाददेखील होतो. कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. याबाबत अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी नगर तालुका पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत या विषयावर चर्चा झाली. महिला सरपंचाची चांगले काम करण्याची इच्छा असूनही हस्तक्षेपामुळे त्यांना काम करता येत नाही. मुळात ग्रामपंचायतीचे कोणत्याही कामात सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणीही लक्ष घालण्याची गरज नाही. बाह्यहस्तक्षेपामुळे गावपातळीवरील विकासकामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप केला तर त्यावर थेट पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा ठराव घेतला आहे. ग्रामसेवक, पंचायत समितीत कर्मचाऱ्यांवर दबाव आला तर ते स्वतः पोलिसात तक्रार करतील. 

आठ दिवसांत झाला फरक
पंचायत समितीने हस्तक्षेप झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा ठराव घेऊन आठ दिवस झाले आहेत. आठ दिवसांत बऱ्यापैकी फरक झाला आहे. सातत्याने ग्रामपंचातीकडे फिरकणारी बाहेरची मंडळी आता येथे येऊन बोलण्याला धस्तावली आहे. महिला सरपंचांनाही या निर्णयामुळे चांगले काम करता येणार असून, ग्रामसेवक संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे पंचायत समितीतून सांगण्यात आले. 

महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत कामांत हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत आम्ही कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. महिलांना पदाची संधी मिळाली तर त्यांना स्वतंत्रपणे काम करू देण्याची आमची भूमिका आहे. कोणाही असले तरी हस्तक्षेप करणाऱ्याची अजिबात गय केली जाणार नाही.
- रामदास भोर, (सभापती, नगर तालुका पंचायत समिती)

इतर ग्रामविकास
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...