agrowon marathi special news related to electricity certificate in village | Agrowon

वीजजोडणीसाठी ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही
गोपाल हागे
गुरुवार, 19 जुलै 2018

राज्यात यापुढे औद्योगिक आणि वाणिज्यिक प्रयोजनार्थ वीज जोडणीकरिता ग्रामपंचायतींकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची आवश्‍यकता नसल्यासंंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने काढल्या आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत अाहे. 

राज्यात यापुढे औद्योगिक आणि वाणिज्यिक प्रयोजनार्थ वीज जोडणीकरिता ग्रामपंचायतींकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची आवश्‍यकता नसल्यासंंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने काढल्या आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत अाहे. 

महावितरणकडून वीज जोडणीसाठी ग्राहकांना ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागितले जाते. हे प्रमाणपत्र मिळविताना ग्रामपंचायत स्तरावरून होणारी अडवणूक आणि त्यातून अवैध आर्थिक व्यवहाराला चालना मिळत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी समोर अालेले अाहेत. त्यातून वीज जोडणीला होणारा विलंब वाणिजिक्य आणि अाैद्योगिक ग्राहकांसाठी नुकसानदायक ठरत होता. ते बघता ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीज जोडणीसाठी ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी न करता महावितरणने ठरवून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावरच वीज जोडणी देण्यात यावी, अशा सूचना ३१ जानेवारी २०१८ रोजी महावितरणच्या सर्व कार्यालयांना दिल्या होत्या. याबाबत अाता ४ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाने परिपत्रक पाठवून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

आैद्योगिक किंवा वाणिज्य प्रयोजनार्थ वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून ग्रामपंचायतीच्या ना-हरकत दाखल्याची मागणी केली जाते. वास्तविक त्याची गरज नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये वीज जोडणीसाठी ना-हरकत दाखला देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे वीज जोडणीसाठी ग्रामपंचयातीकडून ना-हरकत दाखला दिला जात असेल तर तो अवैध ठरतो. याबाबच्या स्पष्ट सूचना जानेवारी २०१८ च्या पत्रात महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी सर्व कार्यालयांना दिल्या होत्या.

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...