agrowon news in marathi, 30 lac liter milk extra in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्त
डी. के. वळसे पाटील
रविवार, 20 मे 2018

मंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख लिटरचे दूध उत्पादन आहे. याशिवाय गुजरात, मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यांतून दररोज २७ ते २८ लाख लिटर दूध महाराष्ट्रात येत आहे. या गुजरातमधील ‘अमूल’कडून २४ लाख लिटर, कर्नाटकमधून दीड लाख लिटर, मध्य प्रदेशातून दीड लाख लिटर यांचा समावेश असून, महाराष्ट्रातून संकलनाच्या तुलनेत पुरवठाच अधिक होत असल्याचेच समोर आले आहे.  

मंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख लिटरचे दूध उत्पादन आहे. याशिवाय गुजरात, मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यांतून दररोज २७ ते २८ लाख लिटर दूध महाराष्ट्रात येत आहे. या गुजरातमधील ‘अमूल’कडून २४ लाख लिटर, कर्नाटकमधून दीड लाख लिटर, मध्य प्रदेशातून दीड लाख लिटर यांचा समावेश असून, महाराष्ट्रातून संकलनाच्या तुलनेत पुरवठाच अधिक होत असल्याचेच समोर आले आहे.  

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमूल डेअरीची राज्यात २४ लाख लिटरची विक्री आहे, तर या तुलनेत ७ ते ८ लाख लिटर दुधाची खरेदी केली जाते. मदर डेअरी नवी दिल्लीला दररोज दहा लाख लिटर दूध राज्यातून जात होते, त्यांनी मागणी कमी केल्यामुळे सध्या एक लाख ५० हजार लिटर दूध जाते. परदेशात भुकटी निर्यात केली जात होती. त्यामुळे दररोज भुकटीसाठी नऊ ते दहा लाख लिटर दूध वापरले जात होते. भुकटी निर्यात बंद आहे. त्यामुळे एकत्रित झालेला परिणाम लक्षात घेता जवळपास तीस लाख लिटर दूध अतिरिक्त आहे.

दूध उत्पादक खरेदी बाजारभाव
वारणा, कात्रज, गोकुळ, राजहंस आदी सहकारी दूध संघांची विक्री व्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना २१ ते २५ रुपये प्रतिलिटर बाजारभाव देतात. पराग, डायनामिक, प्रभात, गोकुळ, सारथी, सहारा, आकाश, स्वराज, गोविंद आदी खासगी दूध प्रकल्पामार्फत दुग्ध जन्य पदार्थाची विक्री केली जाते. त्यामुळे हे खासगी प्रकल्प २१ ते २२ रुपये प्रतिलिटरला बाजारभाव देतात. भुकटीचे विक्रीचे दर १३० ते १३५ रुपये किलो आहेत. जे प्रकल्प फक्त भुकटी तयार करतात, ते १८ ते १९ रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक बाजारभाव देऊ शकत नाही, अशी माहिती समोर आली आहे. 

भुकटी तयार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध प्रकल्पांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. पण अजून त्याबाबतची कार्यवाही नाही. निर्णयात सुस्पष्टपणा नाही. २५ लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. म्हणजे अनुदानाचा फायदा फक्त भुकटी तयार करणाऱ्या प्रकल्पांनाच मिळणार आहे. उर्वरित राज्यातील एक कोटी ९० लाख लिटर दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भुकटी अनुदानाचा कसलाही फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बाजार वाढीचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.

वाजवी अनुदान हवे... 
दूध भुकटी निर्यातीसाठी राज्य व केंद्र सरकारने आठ ते दहा टक्के अनुदान द्यावे. यापूर्वी केंद्र सरकारने वेळोवेळी सात ते आठ टक्के अनुदान दिले आहे. त्याचा चांगला परिणाम झाला होता. कर्नाटक राज्याने थेट दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले आहे. त्यानुसार राज्य शासनाने वाजवी अनुदान देण्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघांकडून व्यक्त होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...