agrowon news in marathi, 4.50 rupees reduction in milk rate from mother dairy, Maharashtra | Agrowon

मदर डेअरीकडून दूध दरात साडेचार रुपयांनी कपात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

​गावात खासगी दूध संकलन केंद्राकडून दुधाची खरेदी केली जात होती. आम्ही त्याच्याकडे दूध विकायचो. सहा महिन्यांपूर्वी गावात मदर डेअरीचे संकलन सुरू झाले. मदरच्या अधिकाऱ्यांनी भाव अधिक देऊ असे सांगितले. सरकारी योजनांचा फायदा मिळेल असेही सांगण्यात अाले. मदरला दूध विकले तेव्हा सुरवातीला चांगला भाव मिळाला; परंतु आतापर्यंत चार वेळा भाव कमी करण्यात अाले अाहेत. 
- शिवानंद नारखेडे, दूध उत्पादक शेतकरी, ता. मोताळा, जि. बुलडाणा

बुलडाणा : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेला मदर डेअरीचा प्रकल्प अाता दूधउत्पादकांना कमी दर देत असल्याने चर्चेत अाला अाहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून अातापर्यंत चारवेळा भाव कमी करण्यात अाला आहे. अाता गायीच्या दुधाचा भाव २३ रुपयांपर्यंत खाली अाला अाहे. पूर्वी हाच दर २७ रुपये ५० पैसे पडत होता, असे दूध उत्पादकांचे म्हणणे अाहे. लिटरमागे साडेचार ते पाच रुपयांचा फटका दूध उत्पादकांना सहन करावा लागत असून वाढलेल्या खर्चाचा ताळेबंद जुळविताना दूधउत्पादक हवालदिल बनला अाहे.  

विदर्भात दुग्धव्यवसाय सध्या कमकुवत अाहे. त्यातही शेतकरी अात्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तर बिकट स्थिती अाहे. या शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीला प्रोत्साहन दिले जात अाहे. याचाच एक भाग म्हणून लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने या भागात मदर डेअरीने दूध संकलन सुरू केले.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, नांदुरा या भागात मदर डेअरीच्या संकलनासाठी विविध केंद्र सुरू अाहेत. हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा गायीच्या दुधाचा (३.५ फॅट, ८.५ S/F) भाव २७ रुपये ५० पैसे मिळत होता असे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. अाता हाच दर २२ ते २३ रुपयांपर्यंत खाली घसरला. अाठ महिन्यांत चार वेळा दर कमी करण्यात अाले. शेतकऱ्यांकडून दर्जेदार दूध उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दर पाडले जात अाहेत. विशेष म्हणजे याचे कुठलेही कारण शेतकऱ्यांना सांगण्यात अालेले नाही.  

वऱ्हाडात नांदुरा, मोताळा तालुक्यात दूग्ध व्यवसायाने चांगले पाय रोवलेले अाहेत. पूर्वी हे शेतकरी खासगी डेअरींच्या संकलन केंद्रांवर दूध घालत. नंतर मदर डेअरीचे संकलन केंद्र उघडल्यानंतर शेतकरी त्याकडे वळू लागले. अनेकांनी कर्ज काढून या संकलनाच्या विश्वासावर नवीन गायी खरेदी केल्या. सरकारी योजनांचा लाभ मिळेल, अापले उत्पन्न वाढेल अशी पशुपालकांना अाशा होती.

परंतु, कर्ज काढून घेतलेल्या जनावरांवर अाता खर्च अधिक व उत्पन्न कमी असा पेच तयार झाला. त्यामुळे आता घेतलेले कर्ज फेडायचे  हा प्रश्न उभा राहला अाहे. मदर डेअरी बुलडाणा जिल्ह्यात संकलन केलेल्या दुधाचे मलकापूर एमअायडीसीमध्ये असलेल्या केंद्रात शीतकरण करून पुढील प्रक्रियेसाठी मुंबई, नागपूरला पाठविते. दुधाचे भाव कमी होत असताना कुठलीही संघटना, नेता याविषयावर अद्यापही बोलायला पुढे अालेला नाही. 

 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...