agrowon news in marathi, 8 lac 75 thousand ton chemical fertilizer used in Marathwada , Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक खताचा वापर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक खताचा सरासरी ८ लाख ७५ हजार टन वापर केला जात आहे. तीन वर्षांच्या माहिती रासायनिक खत वापरात चढ-उतार होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक खताचा सरासरी ८ लाख ७५ हजार टन वापर केला जात आहे. तीन वर्षांच्या माहिती रासायनिक खत वापरात चढ-उतार होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

मराठवाड्यात येत्या खरिपासाठी ५१ लाख २१ हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित आहे. २०१७-१८ च्या खत वापरानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ९ लाख ९७ हजार टन रासायनिक खताचा वापर करण्यात आला होता. याकरिता १० लाख ४२ हजार टन खत मंजूर करण्यात आले आहे. शिवाय मार्च २०१८ अखेर मराठवाड्यात २ लाख ५३ हजार टन खत शिल्लक आहे. या खतामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३७ हजार टन, जालना जिल्ह्यात ४४ हजार टन, बीड जिल्ह्यात ३९ हजार टन, लातूर जिल्ह्यात २५ हजार टन, उस्मानाबाद जिल्ह्यात १० हजार टन, नांदेड जिल्ह्यात ६७ हजार टन, परभणी जिल्ह्यात २० हजार टन तर हिंगोली जिल्ह्यात १६ हजार टनांचा समावेश आहे.
 
खरिपासाठी मराठवाड्यात ३ लाख ६५ हजार टन युरिया, १ लाख ५० हजार टन डीएपी, ५८ हजार टन एमओपी, १ लाख ३४ हजार टन एसएसपी मिळून १० लाख ४२ हजार टन रासायनिक खताचे नियोजन आहे. सरासरी खत वापरानुसार औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी १ लाख ९८ हजार टन, जालना १ लाख ४१ हजार टन, बीड १ लाख ११ हजार टन, लातूर ६२ हजार टन, उस्मानाबाद ४५ हजार टन, नांदेड १ लाख ८४ हजार टन, परभणी ८५ हजार टन, हिंगोली ४९ हजार टन नियोजन आहे.

तीन वर्षांतील वापराविषयीच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत खरिपात खताच्या वापरात वाढ झाली, तर उर्वरित पाच जिल्ह्यांत चढउतार पहायला मिळाला. 

खरिपात रासायनिक खताचा वर्षनिहाय सरासरी वापर (लाख मेट्रीक टनात)  

जिल्हा   २०१५-१६  २०१६-१७    २०१७-१८
औरंगाबाद १.८७   १.९२     २.१६
जालना    १.२७   १.४४  १.५३
बीड   ०.९४  ०.९५ १.४४
लातूर  ०.६१       ०.५१    ०.७३
उस्मानाबाद   ०.४२     ०.३८   ०.५६
नांदेड     १.७०  १.६६  २.१५
परभणी     ०.९८  ०.७३   ०.८४
हिंगोली ०.४९  ०.४१  ०.५६

          

इतर अॅग्रो विशेष
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...