agrowon news in marathi, 80 percent sugar in south Maharashtra sugar industry, Maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८० टक्के साखर शिल्लक
अभिजित डाके/ राजकुमार चौगुले
मंगळवार, 22 मे 2018

उसाच्या एफआरपीचे सूत्र तयार करताना साखरेचा भाव किती असावा हे निश्‍तित हवे. असे झाले तरच उत्पादक व साखर कारखान्यांचे सूत्र जुळू शकते. गेल्या वर्षाचा अभ्यास केल्यास साखरेच्या किमती प्रचंड घसरल्या. परंतु देय रक्कम तेवढीच राहिली. या दबावात साखर कारखाने आल्याने आता कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. 
- आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री, जि. कोल्हापूर.

सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश झालेल्या कारखानदारांनी साखर विक्रीचा विचारच सोडून दिला आहे. सातत्याने २५०० रुपयांपेक्षा खालीच दर असल्याने कारखानदारांना साखर विक्री परवडेनाशी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील विविध कारखान्यांमध्ये सरत्या वर्षात उत्पादित झालेली सुमारे ऐंशी टक्के साखर शिल्लक आहे. या साखरेची विक्री कधी करायची याच चिंतेत कारखानदार 
आहेत. 

 कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांनी २१३.९३ लाख टन गाळप करून २६.६८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. साखर उताऱ्यातही कोल्हापूर विभाग अव्वल असून, या विभागाचा उतारा १२.४७ टक्के आहे. सरत्या हंगामात उसाचे उत्पादन कमी येईल असा अंदाज होता. परंतु सुरवातीपासूनच उसाच्या टनेजमध्ये वाढ झाली. याचा परिणाम साखर उत्पादन वाढण्यावरही झाला. यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांची गोदामे फुल आहेत.

उत्तर प्रदेशच्या साखरेचा फटका
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत नामवंत साखर कारखाने आहेत. या साखरेचा दर्जा चांगला असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील साखरेला गुजरात व राजस्थानमधून चांगली मागणी असते. यंदा मात्र समीकरणे बदलली. या दोन्ही राज्यांना उत्तर प्रदेशातून साखरेचा पुरवठा झाला. वहातुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातून साखर आणणे परवडणारे असल्याने दोन्ही राज्यांनी उत्तर प्रदेशातूनच साखर खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी महाराष्ट्रातील साखर तशीच पडून राहिली. 
 
व्यापाऱ्यांची बिचकत खरेदी
साखरेच्या दरात घसरण होत असल्याने व्यापारी एकदम साखर खरेदी करण्यास तयार नाहीत. यामुळे ज्या वेगात आणि जास्त प्रमाणात साखर जाणे गरजेचे होते. त्या प्रमाणात साखर जात नसल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामाच्या प्रारंभ ३२०० रुपये दर होता. यानंतर दररोज दरात घसरण झाली. परिणामी पुन्हा भाव खाली जातील या शक्‍यतेने व्यापाऱ्यांनी अगदी गरजेइतकीच साखर खरेदी केली. यामुळे साखरेचा स्टॉक हलण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...