agrowon news in marathi, 95:5 formula should be for farmers, Maharashtra | Agrowon

दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा : सतेज पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 मे 2018

वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा चक्रव्यूहात दूध उत्पादक अडकला आहे. एका बाजूला महागाईने कंबरडे मोडले आहे. दुसऱ्या बाजूला ज्या संस्था दूध देत आहे त्या संस्था दूध देत नाहीत. अशी वाईट परिस्थिती सध्या आहे. राज्य शासन दूध उत्पादकांसाठी साखर कारखान्याप्रमाणे ७०:३० असा फॉर्म्यूला करण्याच्या विचारात आहे; पण माझ्या मते हे अतिशय चुकीचे आणि अन्यायकारी होणार आहे.

वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा चक्रव्यूहात दूध उत्पादक अडकला आहे. एका बाजूला महागाईने कंबरडे मोडले आहे. दुसऱ्या बाजूला ज्या संस्था दूध देत आहे त्या संस्था दूध देत नाहीत. अशी वाईट परिस्थिती सध्या आहे. राज्य शासन दूध उत्पादकांसाठी साखर कारखान्याप्रमाणे ७०:३० असा फॉर्म्यूला करण्याच्या विचारात आहे; पण माझ्या मते हे अतिशय चुकीचे आणि अन्यायकारी होणार आहे.

संघ सांगत आहेत की आम्ही ८५ टक्केपर्यंतचा नफा उत्पादकांना देत आहेत; परंतु हे सरळ सरळ चुकीचे आहे. दूध हा एकच पदार्थ असा आहे, की ज्यापासून डब्बल दर मिळतो. आणि त्यापासून अनेक उपपदार्थ तयार होतात. या उपपदार्थ निर्मितीपासून मिळणारा दर हा संघांना मिळू शकतो. महाराष्ट्रातील दूध संघाच्या बाबतीत विचार केला, तर त्यांची मुंबई ही मुख्य बाजारपेठ आहे. पण गोकुळसारख्या अग्रगण्य संघांनीही वितरक वाढविण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे मार्केट आहे तिथेच राहिले आहे.

संघाच्या व्यवस्थापनाने फार त्रास न घेता बाजारपेठ वाढू दिले नाही. मुंबई ही इतकी मोठी बाजारपेठ आहे की तिथे दूध पावडरीची सहज विक्री होते. पण याकडे राज्यातील कोणतेही संघ गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. नियोजनशून्य कारभार संघाचा आहे, यामुळे हे संकट आले आहेत. दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांचे वाढलेले खर्च उत्पादकांना नुकसानीत आणत आहेत. काही संघ म्हणतात, की आम्ही नफ्यातील ८५ टक्के रक्कम उत्पादकांना देतो. जर यांनी खर्च कमी केला तर तो ९५ टक्केपर्यंत जातो; परंतु असे करायला कोणीही तयार नाही. यामुळे साखर कारखान्यांसाठी लागणारा ७०:३० हा फॉर्म्यूला इथे उपयोगाचाच नाही. ९५: ५ हा फॉर्म्यूला वापरला तरच शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतील.

गायीचे दूध घ्यायचे त्यात म्हशीचे मिक्‍स करायचे आणि ते टोन्ड म्हणून जादा किमतीला विकायचे असे काही संघ करतात. लिटरमागे २५ रुपयांचा नेट नफा संघाना होतो; मग हा फायदा शेतकऱ्याला मिळण्यासाठी संघाच्या मार्फत का प्रयत्न केले जात नाहीत.

राज्यातील दुधाचे उत्पादन व त्याचा खर्च याचा सातत्याने आढावा घेऊन एन.डी.डी.बी.ने वेळोवेळी संघांना मार्गदर्शन केले पाहिजे. राज्यातील परिस्थिती काय आहे, आता किती पावडर करावी लागेल, याचे मार्केटिंग कसे करावे लागेल याचे मार्गदर्शन  एन.डी.डी.बी.कडून होणे गरजेचे आहे. पण असे होताना दिसत नाही. एन.डी.डी.बी फक्त अमूलसारख्या बड्या ब्रॅंडला मार्गदर्शन करते का असा सवाल आहे. फक्त प्रोजेक्‍ट करा आणि पैसे द्या इतक्‍याच मर्यादित स्वरूपात कार्यरत आहेत. विस्तारीकरण गरजेचे असले तरी भविष्यातील धोरणांचा अभ्यास करून त्या प्रमाणात दूध संघाना मदत करणे आदी बाबी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. 
- सतेज पाटील, आमदार

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...