agrowon news in marathi, Agri graduate allow in agri admission, Maharashtra | Agrowon

‘कृषी’च्या सेवा प्रवेशात अखेर कृषी पदवीधर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

अकोला : शासनाने यावर्षी जानेवारी महिन्यात कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांसाठीचे सेवाप्रवेश नियम बदलले होते.  यामध्ये कृषी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमामधून ‘कृषी पदवीधर' हा शब्द वगळण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव करीत कृषी पदवीधर पात्र असल्याचे पत्रही काढले. मात्र आता ३० जून रोजी याबाबत शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अखेर यामुळे कृषी सहायकांच्या सेवाप्रवेश नियमाबाबतचा गोंधळ संपेल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अकोला : शासनाने यावर्षी जानेवारी महिन्यात कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांसाठीचे सेवाप्रवेश नियम बदलले होते.  यामध्ये कृषी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमामधून ‘कृषी पदवीधर' हा शब्द वगळण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव करीत कृषी पदवीधर पात्र असल्याचे पत्रही काढले. मात्र आता ३० जून रोजी याबाबत शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अखेर यामुळे कृषी सहायकांच्या सेवाप्रवेश नियमाबाबतचा गोंधळ संपेल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जानेवारीत नियमात केलेल्या बदलांमुळे पदवीधरांमध्ये गोंधळ उडाला होता. त्याची सावरासावर करीत मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी पत्र काढून भरतीसाठी ‘पदवी'' चालेल असे आदेशही दिले होते. दरम्यानच्या काळात राज्यात कृषिसेवक भरती प्रक्रिया राबवल्या गेली. या प्रक्रियेत पदवीधर पात्र ठरल्याने पदविकाधारकांनी जानेवारीतील बदलांचा आधार घेत पदवीधरांबाबत विरोधाची भूमिका घेतली होती. दुसरीकडे कृषिसेवक भरतीवर न्यायालयाने स्टेसुद्धा दिला आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवसांपासून कृषिसेवक भरती रेंगाळली आहे.

या प्रकरणात शासनाची चूक झाल्याचे स्पष्ट झाले. ही चूक सुधारण्यासाठी ३० जून रोजी शासनाने कृषी सहायक पदाची नवीन सेवा प्रवेश नियमाची अधिसूचना काढली. त्यामध्ये विद्यापीठाची कृषी अभियांत्रिकी किंवा कृषी वानिकी विषयातील पदवी किंवा समतुल्य अर्हता तसेच कृषी पदविका किंवा कृषी विषयातील त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता अशी सुधारणा केली आहे.  

न्यायालयाने स्थगिती दिल्याने शासनाने आपली चूक सुधारल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्याचवेळेस शासनाने कृषी पदवीधर कृषी सहायकांवरील अन्याय अजून दूर केलेला नाही. कृषी पर्यवेक्षक पदाचा सेवाप्रवेश नियम अजून कायम आहे. त्यासंबंधात मोठ्या प्रमाणावर कृषी पदवीधरांनी आक्षेप नोंदविले आहेत. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत या अनुषंगाने कृषी पदवीधर संघटना व कृषी पदविका संघर्ष समितीची बैठकही झाली होती.

एका आठवड्यात याबाबत निर्णय घेऊन पुन्हा संघटनांना बोलावतो असे मंत्र्यांनी तेव्हा सांगितले होते. दुर्दैवाने ३१ मे रोजी श्री. फुंडकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे हा निर्णय आता प्रलंबित पडला आहे. याअनुषंगाने विद्यमान कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी समोर येत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...