agrowon news in marathi, agri machinery bank started in parbhani district, Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी  विज्ञान केंद्र आणि क्लेअरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अटकळी (ता. बिलोली ) येथे शुक्रवारी (ता.१८) शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भाडेतत्त्वावरील कृषी औजारे बँक आणि पशुवैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी  विज्ञान केंद्र आणि क्लेअरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अटकळी (ता. बिलोली ) येथे शुक्रवारी (ता.१८) शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भाडेतत्त्वावरील कृषी औजारे बँक आणि पशुवैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

संस्कृती संवर्धन मंडळांचे चेअरमन प्रमोद देशमुख अध्यस्थानी होते. उमरी येथील कृषिउद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. विनोद देशमुख, मधुकर पाटील खतगावकर, विनायकराव कुलकर्णी, शाशिकांतराव देशपांडे, तात्यासाहेब देशमुख, आनंदिदास महाजन, गणेश पाटील ढोलउमरीकर, गंगाधर अनपलवार, रामदास शेरे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस शेतीचे धारणआ क्षेत्र कमी होत आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या वाढत आहे. शेतीकामासाठी पशुधनाचा सांभाळ करणे कठीण होत आहे. मजुरीचे वाढलेले दर तसेच वेळेवर उपलब्ध न होणे आदी समस्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत भेडसावत आहेत. या सर्व बाबीवर मात करण्यासाठी आत्याधुनिक ट्रॅक्टर   चलित नांगर, वखर, बीबीएफ पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पंजी, मळणीयंत्र, कल्टीव्हेटर, मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र, हळद लागवड व काढणी यंत्र, सरी वरंबा पाडणी यंत्र आदी   अवजारे असणारी शेती अवजारे बँक अटकळी (ता. बिलोली) येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे.

तसेच, परिसरातील शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा- सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे जातिवंत जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. या बाबींचा विचार करून केंद्रातर्फे शेतकऱ्यांना तज्‍ज्ञ पशुवैद्यकांमार्फत सेवा गोठ्यापर्यंत पुरविण्यात येणार आहेत. या सेवेचा प्रारंभदेखील अटकळी(ता. बिलोली) येथे करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा. कपिल इंगळे आणि डॉ. भूषण सदार यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. दत्ता म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रा. व्यंकट शिंदे यांनी मानले. विनोद देशमुख, इंजी. वैजनाथ बोंबले आदींनी पुढाकार घेतला. या वेळी अटकळी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...