दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन ः अण्णा हजारे

दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन ः अण्णा हजारे
दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन ः अण्णा हजारे

नगर ः डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतगृह उभारावेत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्ताची नेमणूक करावी यासह विविध मागण्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तिसरे स्मरणपत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.   पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविलेल्या या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविल्या आहेत.  पत्रात म्हटले आहे, की सत्तेवर आल्यावर लोकपाल व लोकायुक्त कायदा तत्काळ अमलात आणू व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही लागू करू, अशी आश्‍वासने आपण निवडणूक काळात जनतेला दिली होती. मात्र, सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली, तरीही काहीच कारवाई झाली नाही. मी २३ मार्चला दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले, त्या वेळीही आपण ‘या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊ,’ असे सांगितले. त्यामुळे मी आंदोलन मागे घेतले. त्यालाही तीन महिने लोटले, तरी अद्याप आपण कार्यवाही केलेली नाही. मी यापूर्वी दोन पत्रे पाठवली. त्यांनाही आपण फक्त ‘आपले पत्र मिळाले,’ एवढेच उत्तर दिले. आता हे तिसरे स्मरणपत्र देत आहे. आमच्या मागण्यांबाबत व आश्‍वासनांबाबत येत्या दोन ऑक्‍टोबरपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास राळेगणसिद्धी येथे दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com