agrowon news in marathi, bogus university director arrested, Maharashtra | Agrowon

सोलापुरातील बोगस कृषी विद्यापीठाचा संस्थापक संचालक अण्णा इसुरे अटकेत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

या प्रकरणाचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. लवकरच उर्वरित संशयितानाही अटक केली जाईल, गुन्हा दाखल झालेल्या चार संशयितांशिवायही अन्य कोणी लोक याप्रकरणाशी निगडित आहेत का, याची चौकशी सुरू आहे. सर्व बाजूने आमची चौकशी सुरू आहे. 
-विजय जाधव, पोलिस निरीक्षक, अक्कलकाेट पोलिस ठाणे

सोलापूर ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची कोणतीही मान्यता नसताना सोलापूर जिल्ह्यात बेकायदा बोगस राष्ट्रीय मागासवर्ग खुले कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत राज्यातील १४ जिल्ह्यांत बोगस कृषी विद्यालय चालवून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालकाला पोलिसांनी अखेर अटक केली. अण्णा इसुरे असे या संचालकाचे नाव असून, १३ जुलैपर्यंत न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पाच दिवसांपूर्वीच या बेकायदा विद्यापीठावर अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तसेच ‘ॲग्रोवन' या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. तीन महिन्यांपूर्वीही एप्रिलमध्ये ‘ॲग्रोवन'ने या प्रकरणावरील कारवाईबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. पोलिसांनी आता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासची चक्रे वेगाने फिरवली आहेत. त्यासाठी खास पथके रवाना करून यातील संशयितांचा शोध सुरू केला आहे.

सध्या यातील प्रमुख संशयित आणि संस्थापक संचालक अण्णा इसुरे याला पोलिसांनी सोलापुरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित डॉ. आशिष सर्जेराव ढोके (बोरखेडा बु., जि. बुलडाणा), विठ्ठल गवळी (चिखली रोड, येळगाव, जि. बुलडाणा) आणि बी. एस. पाटील (सोलापूर) यांच्या मागावरही पोलिस आहेत. दरम्यान, इसुरे याला अटकेनंतर पोलिसांनी अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्याच्या चौकशीसह या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...