पीकविमाप्रकरणी ओरिएंट कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार

पीकविमाप्रकरणी ओरिएंट कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार
पीकविमाप्रकरणी ओरिएंट कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार

जळगाव : जिल्हा बॅंकेने ७२ हजार ५५४ सभासदांची १२ कोटी ९५ लाख ६६५ हजार रुपये विमा रक्‍कम ॲक्‍सिस बॅंकेत आरटीजेस करून कंपनीकडे भरली आहे. परंतु पात्र असलेल्या १७ हजार ४१० सभासदांना हक्काची विमा रक्कम अदा केली नाही. या प्रकरणी ओरिएंट विमा कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या विम्याची १२ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम भरलीच नसल्याची तक्रार ओरिएंट विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी विमा कंपनी व जिल्हा बॅंक यांना या प्रकरणी माहिती सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे खळबळ उडाली.  जिल्हा बॅंकेतर्फे या प्रकरणी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, ते म्हणाले, की विमा कंपनी पूर्णपणे दिशाभूल करीत आहे. आम्ही ७२ हजार ५५४ सभासदांची १२ कोटी ९५ लाख ६५ हजार रुपये ॲक्‍सिस बॅंकेत आरटीजीस करून भरली. त्यातील १२ कोटी ९५ लाख ३६ हजार ही रक्‍कम कंपनीने स्वीकारली. विमाधारकांची ही रक्कम माहिती पोर्टलवर भरतेवेळी अनेक प्रकारच्या अडचणी बॅंकेत निर्माण झाल्या. बहुतेक वेळा पोर्टल बंद असायचे, त्यामुळे सभासदांची माहिती भरण्यास खूप कमी वेळ मिळायचा. या अडचणीबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले, मात्र त्यांनी लक्ष दिले नसल्याचेही सांगितले. ही रक्कम आरटीजेसद्वारा भरल्याचा पुरावाही बॅंकेतर्फे देण्यात आला.  ओरिएंट कंपनीविरुद्ध दिलेल्या तक्रारीबाबत माहिती देताना देशमुख यांनी सांगितले की, बॅंकेने विम्याची रक्‍कम स्वीकारली, परंतु खरीप हंगाम २०१७ मधील पीकविमाधारक सभासदांना तसेच जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत नुकसान भरपाई जाहीर केली. यात फक्त १७ हजार ४१० सभासदांना १९ कोटी ९० लाख ०५ हजार नुकसान भरपाई दिली. मात्र उर्वरित १६ हजार ७५७ सभासदांना २४ कोटी ८० लाख ५७ हजार एवढी नुकसान भरपाई अद्यापही दिलेली नाही. याबाबत बॅंकेने दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. ही रक्कम कंपनीने लबाडीच्या हेतूने स्वतःकडे ठेवून घेतली आहे. या प्रकरणी ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  सहा अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार  जिल्हाधिकाऱ्यांनी दाेन जुलैला घेतलेल्या पीकविमा योजनेच्या आढावा समितीच्या बैठकीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बॅंकेचे सरव्यवस्थापक प्रल्हाद भाऊलाल सपकाळे यांनी कलम ४०३, ४०६, ४२०, १२० ब प्रमाणे तक्रार दिली आहे. यात ओरिएंट इन्शुरन्स कंपनीचे आर. आर. सिंग (उपसरव्यवस्थापक), वनिता जोशी (विभागीय व्यवस्थापक), मंजू एस. नायर (विभागीय व्यवस्थापक), अरुण जैस्वार (विभागीय व्यवस्थापक), निशांत मधुकर कांबळे (प्रशासकीय अधिकारी), संजय चेटगे (व्यवस्थापक) यांना आरोपी करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com