agrowon news in marathi, case against orient company, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पीकविमाप्रकरणी ओरिएंट कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018

जळगाव : जिल्हा बॅंकेने ७२ हजार ५५४ सभासदांची १२ कोटी ९५ लाख ६६५ हजार रुपये विमा रक्‍कम ॲक्‍सिस बॅंकेत आरटीजेस करून कंपनीकडे भरली आहे. परंतु पात्र असलेल्या १७ हजार ४१० सभासदांना हक्काची विमा रक्कम अदा केली नाही. या प्रकरणी ओरिएंट विमा कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

जळगाव : जिल्हा बॅंकेने ७२ हजार ५५४ सभासदांची १२ कोटी ९५ लाख ६६५ हजार रुपये विमा रक्‍कम ॲक्‍सिस बॅंकेत आरटीजेस करून कंपनीकडे भरली आहे. परंतु पात्र असलेल्या १७ हजार ४१० सभासदांना हक्काची विमा रक्कम अदा केली नाही. या प्रकरणी ओरिएंट विमा कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या विम्याची १२ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम भरलीच नसल्याची तक्रार ओरिएंट विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी विमा कंपनी व जिल्हा बॅंक यांना या प्रकरणी माहिती सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे खळबळ उडाली. 

जिल्हा बॅंकेतर्फे या प्रकरणी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, ते म्हणाले, की विमा कंपनी पूर्णपणे दिशाभूल करीत आहे. आम्ही ७२ हजार ५५४ सभासदांची १२ कोटी ९५ लाख ६५ हजार रुपये ॲक्‍सिस बॅंकेत आरटीजीस करून भरली. त्यातील १२ कोटी ९५ लाख ३६ हजार ही रक्‍कम कंपनीने स्वीकारली. विमाधारकांची ही रक्कम माहिती पोर्टलवर भरतेवेळी अनेक प्रकारच्या अडचणी बॅंकेत निर्माण झाल्या. बहुतेक वेळा पोर्टल बंद असायचे, त्यामुळे सभासदांची माहिती भरण्यास खूप कमी वेळ मिळायचा. या अडचणीबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले, मात्र त्यांनी लक्ष दिले नसल्याचेही सांगितले. ही रक्कम आरटीजेसद्वारा भरल्याचा पुरावाही बॅंकेतर्फे देण्यात आला. 

ओरिएंट कंपनीविरुद्ध दिलेल्या तक्रारीबाबत माहिती देताना देशमुख यांनी सांगितले की, बॅंकेने विम्याची रक्‍कम स्वीकारली, परंतु खरीप हंगाम २०१७ मधील पीकविमाधारक सभासदांना तसेच जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत नुकसान भरपाई जाहीर केली. यात फक्त १७ हजार ४१० सभासदांना १९ कोटी ९० लाख ०५ हजार नुकसान भरपाई दिली. मात्र उर्वरित १६ हजार ७५७ सभासदांना २४ कोटी ८० लाख ५७ हजार एवढी नुकसान भरपाई अद्यापही दिलेली नाही. याबाबत बॅंकेने दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. ही रक्कम कंपनीने लबाडीच्या हेतूने स्वतःकडे ठेवून घेतली आहे. या प्रकरणी ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

सहा अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार 
जिल्हाधिकाऱ्यांनी दाेन जुलैला घेतलेल्या पीकविमा योजनेच्या आढावा समितीच्या बैठकीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बॅंकेचे सरव्यवस्थापक प्रल्हाद भाऊलाल सपकाळे यांनी कलम ४०३, ४०६, ४२०, १२० ब प्रमाणे तक्रार दिली आहे. यात ओरिएंट इन्शुरन्स कंपनीचे आर. आर. सिंग (उपसरव्यवस्थापक), वनिता जोशी (विभागीय व्यवस्थापक), मंजू एस. नायर (विभागीय व्यवस्थापक), अरुण जैस्वार (विभागीय व्यवस्थापक), निशांत मधुकर कांबळे (प्रशासकीय अधिकारी), संजय चेटगे (व्यवस्थापक) यांना आरोपी करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...
कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...
पुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता....
‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...