agrowon news in marathi, case in solapur APMC fraud, Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींसह संचालकांना नोटिसा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष लेखापरीक्षण अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी तत्कालीन सभापती, संचालक व सचिवांसह ३३ जणांना ५७ (४) अन्वये बाजार समितीच्या नुकसानीपोटी तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार त्यांना १३ जुलै रोजी म्हणणे मांडण्याची संधीही देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही बाजार समितीची कायदेशीर लढाई सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष लेखापरीक्षण अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी तत्कालीन सभापती, संचालक व सचिवांसह ३३ जणांना ५७ (४) अन्वये बाजार समितीच्या नुकसानीपोटी तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार त्यांना १३ जुलै रोजी म्हणणे मांडण्याची संधीही देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही बाजार समितीची कायदेशीर लढाई सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर बाजार समितीच्या २०११-१२ ते २०१६-१७ या वर्षातील कामकाजाचे लेखापरीक्षण झाले. त्यानंतर आता त्याचे बाजार समितीचे प्रशासक तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी फेर लेखापरीक्षण केले. त्या अहवालानुसार १६ मुद्द्यांवर तत्कालीन सभापती, संचालक व सचिवांना वैयक्‍तिक व सामूहिक जबाबदारी निश्‍चित करण्याची नोटीस बजावली आहे.

तत्पूर्वी तत्कालीन संचालकांनी ३९ कोटी ४३ लाख ६९ हजार १५१ रुपये ६० पैशांचे बाजार समितीचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर त्या संचालकांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला. बाजार समितीचे अपात्र ठरलेले अर्ज पात्र ठरवून निवडणूकही लढविली. आता पुन्हा त्यांना जबाबदारी निश्‍चितीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  

यांना बजावल्या नोटिसा 
इंदुमती अलगोंड-पाटील, बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते, दिलीप माने, नागराज पाटील, शंकर येणेगुरे, शिवानंद चिडगुंपी, ऊर्मिला शिंदे, अविनाश मार्तंडे, रजाक शेख, अहमद निंबाळे, डी. एन. गायकवाड, महादेव पाटील, अप्पासाहेब उंबरजे, प्रभाकर विभूते, दगडू जाधव, राजशेखर शिवदारे, केदार विभूते, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजर पाटील, शोभा होनमुर्गीकर, उत्तरेश्‍वर भुट्टे, अशोक देवकते, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, चंद्रकांत खुपसंगे, नसिर खलिफा, बसवराज दुलंगे, हकीम शेख, सिद्रामप्पा यारगले, सचिव धनराज कमलापुरे, उमेश दळवी यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

ठपका ठेवल्याची प्रमुख कारणे
बांधकाम ठेकेदारांनी कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, तरीही त्यांच्याकडून दंड न घेता त्यांना मुदतवाढ दिली. प्रक्रिया विभागातील जागेचा गैरवापर, ब्रह्मदेवदादा माने बॅंकेत ठेवी ठेवल्या, नियमबाह्य कर्मचारी भरती, बाजार शुल्क व देखरेख फीची रक्‍कम विलंबाने जमा केलेल्या व्यापाऱ्यांकडून दंड घेतला नाही, व्यापाऱ्यांनी परत केलेले गाळे लिलावाविना वाटप केले. या सर्व बाबींमुळे बाजार समितीचे नुकसान झाल्याचा ठपका या लेखापरीक्षणात तत्कालीन संचालकांवर ठेवण्यात आला आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...