agrowon news in marathi, china depend on Indian cotton, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

चीनची भिस्त भारतीय कापसावरच

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 15 जून 2018

रुईच्या तुडवड्याचे संकट सूत गिरण्यांसमोर आहे. सूताचे दर वाढले आहेत. सोबतच रुईदेखील महागली आहे. निर्यात व आयात खुली आहे. पुढे चीनला गाठींची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. कारण, चीनमध्ये उत्पादन ३५० लाख गाठी येईल. त्यांची गरज किमान ५०० लाख गाठींची आहे. भारतीय रुई जगात सर्वांत स्वस्त आहे. तिची निर्यात पुढील हंगामातही जोमातच होईल. 
- दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा, जि. नंदुरबार

जळगाव ः डॉरलचे वधारते दर, चीनमधील गाठींच्या बफर स्टॉक (संरक्षित साठा) मध्ये झालेली मोठी घट आदी कारणांमुळे भारतीय कापसाची निर्यात आगामी हंगामात मोठ्या प्रमाणात वाढून मागील सर्व विक्रम मोडील. देशातून चीनसह इतर देशांमध्ये सुमारे एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक गाठींची निर्यात होईल. याच वेळी भारतात आगामी हंगामात कापूस उत्पादन सरत्या हंगामाच्या तुलनेत घटून ते ३४८ लाख गाठींपर्यंत खाली येणार आहे. 

उत्पादनातील घटीचा प्रश्‍न आगामी हंगामातही कायम राहणार असतानाच रुपयाचे अवमूल्यन व वधारता डॉलर यांमुळे भारतीय कापूस आयातदारांना परवडणारा ठरत आहे. भारतात कापूस आयात महागडी ठरत असून, भारतीय खंडी (३५६ किलो रुई) परदेशी आयातदारांना सद्यःस्थितीत ४६००० ते ४६५०० दरात पडत आहे. तर भारतीय व इतर आयातदारांना ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची खंडी ५८००० ते ५९००० रुपयांना पडत आहे.

चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे चीनला आपला संरक्षित साठा (बफर) वाढविण्यासाठी भारताच्या दाराशी पुढेही यावे लागेल. चीन आगामी हंगामात ११७ लाख गाठींची आयात करणार आहे. 

चीनने सूत आयातीवर मध्यंतरी भर दिला. परंतु, भारतीय व बांगलादेशी सूतगिरण्यांसमोर रुईच्या तुटवड्याचे संकट पुढील काही महिन्यांत उभे ठाकणार आहे. सूताचे दरही दणकले आहेत. चीनने आपल्या कापूस व्यापार धोरणात आयातीसंबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. चीनकडे ४०० लाख गाठींचा साठा होता. तो आजघडीला फक्त २० टक्केच शिल्लक आहे.

चीनमध्ये सूताचे उत्पादन कमी होऊन कापड व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेता चीनने आतापासूनच गाठींची आयात वाढविली आहे. पण पुरेसा कापूस किंवा गाठींची समस्या चीनला सतावू लागली आहे. याच वेळी चीनचा सूत निर्मितीचा व्यवसाय बांगलादेशातही आहे. 

सोबतच बांगलादेश सूत उत्पादनात अग्रेसर ठरत असून, बांगलादेशलाही आगामी हंगामात किमान ६० लाख गाठींची गरज भासणार आहे. बांगलादेशला भारतातून कापूस आयात टॅक्‍स फ्री असल्याने बांगलादेशने भारतातून सुमारे ५५ लाख गाठींची आयात सरत्या हंगामात केली आहे. पुढे चीनसह बांगलादेशकडून भारतीय कापसाला मोठी मागणी राहणार असून, यामुळे कापूस निर्यात किमान एक कोटी गाठींपर्यंत जाईल व मागील सर्व विक्रम मोडीत काढेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी म्हणाले. 

आगामी हंगामातील ताळेबंद (एक गाठ 170 किलो रुई)
देशातील कापूस लागवड
110 ते 113 लाख हेक्‍टर

आगामी हंगामासंबंधी गाठींचा शिलकी साठा
15 ते 18 लाख गाठी

देशांतर्गत उत्पादन
346 ते 348 लाख गाठी

देशांगर्तत सूतगिरण्यांची गरज
320 लाख गाठी

देशातील लघू वस्त्रोद्योगांची गरज (एसएसआय)
किमान 30 लाख गाठी

देशातील मिलांव्यतिरिक्त असलेली गाठींची गरज
15 लाख गाठी

आगामी हंगामातील अपेक्षित निर्यात
एक कोटी गाठी


इतर अॅग्रो विशेष
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...
संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...