agrowon news in marathi, correction not be done in loan waiver scheme, Maharashtra | Agrowon

कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जमधील चुका दुरुस्तीसाठी ‘एडिट आॅप्शन’ नसल्याचे कारणे देत शेतकऱ्यांची अडवणूक हाेत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत आहे. 

पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जमधील चुका दुरुस्तीसाठी ‘एडिट आॅप्शन’ नसल्याचे कारणे देत शेतकऱ्यांची अडवणूक हाेत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत आहे. 

वाळकी (ता. दाैंड) येथील शेतकरी सीताराम गणपत साळुंखे यांनी पारगाव येथील महा ई सेवा केंद्रामध्ये कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केला. मात्र बचत खाते आणि कर्ज खाते क्रमांक ई सेवा आॅपरेटरने चुकविल्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरण्याची भीती आहे. याबाबत साळुंखे यांनी संबधित ई-सेवा आॅपरेटरला झालेली चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर संगणक प्रणालीमध्ये ‘एडिट आॅप्शन’ नसल्याचे कारण देत दुरुस्ती करता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे साळुंखे व्यथित हाेऊन दुसऱ्या ई-सेवा केंद्रामध्ये चाैकशीसाठी गेले; मात्र त्याही ठिकाणी त्यांना हाच अनुभव आला. संगणक प्रणालीमधील चुकांमुळे कर्जमाफीसाठी नाेंदणीसाठीच्या मुदतवाढीची संधी शेतकऱ्यांना साधता येत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत बाेलताना सीताराम साळुंखे म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांच्या नावावर साडेतीन लाखांचे कर्ज असून, कर्जमाफीच्या याेजनेचा आॅनलाइन अर्ज भरताना आॅपरेटरद्वारे खाते क्रमांक भरताना चूक झाली; मात्र ही चूक सुधारण्यासाठी एडिट आॅप्शन नसल्याचे सांगत माझा अर्ज दुरुस्तीसाठी नकार दिला. अर्ज भरण्याची अथवा दुरुस्तीची मुदत जवळ येत असल्याने मला कर्जमाफीचा लाभ मिळणे अवघड झाले आहे.’’

‘एडिट आॅप्शन’ सुरू : कटके
संगणक प्रणालीमध्ये एडिट आॅप्शन सुरू करण्यात आले असून, अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करता येणार आहेत. यामुळे महा ई सेवा केंद्रचालकांना आपल्या सर्व आॅपरेटरला याबाबत सूचना द्याव्यात. एकही शेतकऱ्याचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला जाऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. नजरचुकीने अर्ज भरताना चुका झाल्या असतील, तर त्या चुका दुरुस्त करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे...रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार...
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९...औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही...
`ग्रीन होम`मध्ये सेकंड होम, फार्म हाउस...पुणे : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘ग्रीन होम एक्स्पो...
कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या ...पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या...
लागवडयोग्य `पोटखराब`ची नोंद होणार सात...पुणे  ः पोटखराब जमीन लागवडीयोग्य केली असेल...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली...नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या...नाशिक : चालू वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर...
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या...नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती...
धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन...धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...