कृषी पदवीकाधारकांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी

कृषी पदवीकाधारकांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी
कृषी पदवीकाधारकांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी

वर्धा ः कृषी पदवीकाधारक विद्यार्थ्यांना कृषी पदवीसाठी प्रवेश देण्याची तरतूद होती. परंतु, यावर्षी अद्याप त्या संदर्भाने निर्णय झाला नसल्याने पदवीकाधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्याची दखल घेत या संदर्भाने ऑनलाइन प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रणजीत कांबळे यांनी केली आहे.  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी त्यांनी या संदर्भाने चर्चा केली. त्यांच्या नेतृत्वात नंतर पदवीकाधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना हे निवेदन पाठविण्यात येणार आहे. निवेदनानुसार, 23 जून रोजी डिप्लोमा अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला. दुसरीकडे कृषी पदवी अभ्यासक्रमाचे सत्र देखील सुरू होऊन बराच कालावधी लोटला आहे. असे असताना पदवीकाधारकांसाठीची ऑनलाइन प्रक्रिया अद्यापही राबविण्यात आली नाही. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रमावस्था असल्याने ती दूर करावी, अशी मागणी आहे. या वेळी एनएसयुआयचे अध्यक्ष प्रतीक भोगे, देवळी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विपीन राऊत, मनिष गंगमवार, अनूप बाळसराफ, विशाल कुहीते, पंकज वरभे, शुभम बानोडे, सौरभ लोहकरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com