सोलापूर बाजार समितीकडील कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी

सोलापूर बाजार समितीकडील कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी
सोलापूर बाजार समितीकडील कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींसह ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता तपासकामाला सुरवात केली असून, या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी नुकतीच बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणातील काही कागदपत्रांची तपासणी केली. गुन्हा दाखल झालेल्या सभापतींसह संचालकांवर कोणत्याहीक्षणी अटकेची कारवाई होऊ शकते, त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०११ ते २०१६ या कालावधीत ३९ कोटी सहा लाख ३९ हजार १९३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने,  इंदुमती अलगोंडा यांच्यासह ३७ जणांवर विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. २२) जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. बाजार समितीत १ एप्रिल २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीत १४ समिती सदस्य, एक सचिव आणि १८ ऑक्‍टोबर २०११ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत २० समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांत दाखल झालेल्या या प्रकरणामुळे बाजार समितीतील राजकारण वेगळ्याच वळणावर आले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यातील परंपरागत राजकीय लढाई असे काहीजण याचे वर्णन करत आहेत. तर काही जण गैरव्यवहार झालाच आहे, त्यामुळे अशीच कारवाई अपेक्षित आहे, असे म्हणत या कारवाईचे समर्थन करत आहेत. पोलिसांनीही या कामात सर्वाधिक लक्ष घालून तातडीने कामकाजाला सुरवात केली आहे. पोलिसांच्या या हालचाली पाहून तत्कालीन सभापतींसह काही संचालक सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असताना ‘टूर’वर असल्याचे सांगण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com