मुगाला ६९७५ रुपये हमीभाव द्या : केंद्रीय कृषी मुल्य आयोग

मुग
मुग

नवी दिल्ली ः देशात मुगाचे उत्पादन अलीकडच्या काळात घटले आहे. कमी दरामुळे शेतकरी कमी उत्पादन घेतात. त्यामुळे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मुगाच्या हमीभावात १४०० रुपयांनी वाढ करून २०१८-१९ च्या खरीप हंगामात ६९७५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे घोषित केले आहे. मूग उत्पादकांना हा हमीभाव केंद्राने जाहीर केल्यास दुप्पट उत्पन्न मिळण्यास मदत होईल. मागील वर्षी  मुगाचा हमीभाव प्रतिक्विंटल ५५७५ रुपये होता. त्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामात १४०० रुपयांची वाढ करून ६९७५ रुपये करण्याची शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केली आहे. तुरीच्या हमीभावात २२५ रुपये प्रतिक्विंटल तर उडदाच्या हमीभावात २०० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्याची शिफारस केली आहे. आयोगाने केंद्राला तुरीच्या हमीभावात क्विंटलमागे २२५ रुपयांची वाढ करून ५६७५ रुपये ठरविण्याची शिफारस केली आहे. मागील हंगामात तुरीला ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव होता. उडदाच्या हमीभावातही २०० रुपयांनी वाढ करून ५६०० रुपये हमीभाव जाहीर करण्याची शिफारस केली आहे. मागील वर्षी ५४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव उडदाला होता. रागीच्या हमीभावात १००० रुपये वाढ करून २९०० रुपये हमीभाव जाहीर करण्याची शिफारस आहे. मागील हंगामात १९०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव होता. तसेच मक्याच्या हमीभावात २७५ रुपयांनी वाढ करुन १७०० रुपये हमीभावाची शिफारस आहे.  २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार हे शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार असल्याचे जाहीर केले होते.  भावांतर योजनेचाही समावेश केंद्र सरकार कृषिमूल्य आयोगाने पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची शिफारस केली आहे. शिवाय, केंद्र सरकार हे सर्व पीक खरेदी करण्यासाठी व्यवस्था उभी करण्याचे काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी सरकार मध्य प्रदेश सरकारच्या भावांतर योजनेचा आणि बाजार विम्याचा विचार करत आहे. तसेच सरकारने जाहीर केलेल्या दीडपट हमीभावाचा लाभ देशातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. तसेच कृषी मंत्रालयाने या योजनेची एक कॅबिनेट नोट काढली आहे. या नोटच्या प्रती अर्थमंत्रालयासह विविध विभागांना देण्यात आल्या आहेत आणि या योजनेवर शिफारशी मागविल्या आहेत.   केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केलेली शिफारस

मूग     १४००
तूर       २२५
उडीद       २०० 
रागी     १०००
मका         २७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com