agrowon news in marathi, farmers waiting for tur, gram subsidy, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना प्रतीक्षा तूर, हरभरा अनुदानाची
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 जुलै 2018

अकोला ः  राज्यातील ज्या तूर व हरभरा उत्पादकांचा माल खरेदी होऊ शकला नाही अशांना प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय करीत त्यासाठी ४८० कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला अाहे. मात्र महसूल यंत्रणांमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील, असे सांगितले जात असले तरी या यंत्रणांकडे अाधीच असंख्य कामे असल्याने त्यांनी फारसा पुढाकार घेतलेला नाही. यामुळे तूर, हरभऱ्याचे लाभार्थी अंतिम व्हायला बराच कालावधी लागू शकतो, अशी शंका यंत्रणा स्तरावरच घेतली जाऊ लागली अाहे.

अकोला ः  राज्यातील ज्या तूर व हरभरा उत्पादकांचा माल खरेदी होऊ शकला नाही अशांना प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय करीत त्यासाठी ४८० कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला अाहे. मात्र महसूल यंत्रणांमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील, असे सांगितले जात असले तरी या यंत्रणांकडे अाधीच असंख्य कामे असल्याने त्यांनी फारसा पुढाकार घेतलेला नाही. यामुळे तूर, हरभऱ्याचे लाभार्थी अंतिम व्हायला बराच कालावधी लागू शकतो, अशी शंका यंत्रणा स्तरावरच घेतली जाऊ लागली अाहे.

या हंगामात शासनाने हमीभावाने तूर, हरभरा खरेदीसाठी अाॅनलाइन प्रक्रिया राबवली. बहुतांश वेळा साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने व बारदान्याअभावी ही खरेदी बंदच होती. शासनाने मुदतवाढ देऊनही फारसा फायदा झाला नसल्याची वस्तुस्थिती अाहे.  मे महिन्याच्या शेवटी तूर व जूनमध्ये हरभरा खरेदी बंद करण्यात अाली. खरेदी बंद झाल्यानंतरही हजारो शेतकरी अापला शेतीमाल विकू शकले नसल्याची बाब समोर अाल्याने तसेच सर्वच स्तरातून हा माल खरेदीची मागणी होत असल्याने शासनाने धोरणात्मक निर्णय करीत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.
 
मोजमाप न झालेले अाणि अाॅनलाइन नावे नोंदणी केलेल्यांच्या याद्या तयार करून त्यांना उपरोक्त निर्णयानुसार मदत करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांंच्या देखरेखीत हे काम केले जाणार अाहे. मुळात मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे यंत्रणा अत्यंत कमी अाहे. त्यामुळे महसूल व पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेतले जाईल, असे सांगतिले जात होते. 

अाता ही मदत देताना सर्व्हे होणार का, शेतकऱ्यांच्या मालाचा पंचनामा केला जाईल काय किंवा ज्यांनी नोंदणी केली व मोजमाप झालेले नाही अशांना थेट मदत मिळेल काय, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केले जात अाहेत. परंतु  ठोस उत्तर कुठलीही यंत्रणा अद्याप देत नाही. काम सुरू झालेले अाहे, एवढेच उत्तर अधिकारी देत अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...