शेततळे
शेततळे

यवतमाळ जिल्ह्यात एक हजार शेततळ्यात मत्सशेती

यवतमाळ : शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मीती झाली आहे. या शेततळ्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी एका हजार शेततळ्यात मत्सशेतीचा अभिनव प्रयोग केला जाणार असून मत्सशेतीसाठी आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. सततचा दुष्काळ, होणारी नापिकी त्यामुळे वाढलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी नाइलाजाने आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. शेतकरी अशा जाचातून मुक्त व्हावा, असा टोकाचा निर्णय त्याने घेऊ नये, यासाठी शेतीसोबत जोडधंदा, आधुनिक शेतीतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचेकडून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधी शेततळे तयार करण्याचे काम हाती घेतले. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळे करणाऱ्या यादीत जिल्हा राज्यात अव्वल क्रंमाकात आहे. तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. 

केम व टाटाट्रस्ट यांच्या माध्यमातून शेततळे तयार केलेल्या जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांची निवड करून या शेततळ्यात ‘मत्सशेती''चा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन मत्सबीज ‘सीडलिंग''उपलब्ध करून देणार आहे. मत्सबीज कलकत्ता येथून उपलब्ध करून द्यायचे की कोणता पर्याय घ्यायचा या तांत्रिक बाबीवर विचार सुरू असला तरी येत्या काही दिवसांत मत्सशेतीचा प्रयोग जिल्ह्यात सुरू होणार आहे. रेशीम शेतीनंतर दुसरा प्रयोग जिल्ह्यात यंदा रेशीम शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडणारी रेशीमशेती आहे. त्यानंतर आता मत्सशेतीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. अधिवेशनादरम्यान १० जुलैला जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. या बैठकीत शेततळ्यात मत्सशेतीबाबत प्रेझेंटेकशन केले जाणार आहे. शिवाय, काही अडचणीबाबत चर्चा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com