agrowon news in marathi, five lakh bales export contract made by Chinese importer, Maharashtra | Agrowon

भारतातून पाच लाख गाठी कापूस आयातीचा चीनचा करार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई ः चीनमध्ये कापूस लागवड नियोजन चुकल्याने २०१७-१८ च्या हंगामात कमी उत्पादन झाले होते. त्यामुळे चीनला संरक्षित साठ्याचा आणि वापर आयात करून देशांतर्गत उद्योगाची गरज भागवावी लागली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही चीनला कापूस तुटवडा भासणार असून, येथील व्यापाऱ्यांना भारतातून कापूस खरेदीचे करार करण्यास सुरवात केली आहे. चीनमधील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस आयातीचे करार भारतीय निर्यातदारांशी केले आहे. 

मुंबई ः चीनमध्ये कापूस लागवड नियोजन चुकल्याने २०१७-१८ च्या हंगामात कमी उत्पादन झाले होते. त्यामुळे चीनला संरक्षित साठ्याचा आणि वापर आयात करून देशांतर्गत उद्योगाची गरज भागवावी लागली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही चीनला कापूस तुटवडा भासणार असून, येथील व्यापाऱ्यांना भारतातून कापूस खरेदीचे करार करण्यास सुरवात केली आहे. चीनमधील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस आयातीचे करार भारतीय निर्यातदारांशी केले आहे. 

कापूस उत्पादनात घट झाल्यानंतर चीनमधील आयातदारांचा भर हा भारतातून कापूस आयातीवरच राहिला आहे. नुकतेच चीनमधील आयातदारांनी भारतातून यंदाच्या, २०१८-१९ च्या हंगामात कापूस आयातीचे करार केले आहे. त्यामुळे नव्या हंगामातही भारतातून चीनची आयात सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत.

मुंबई येथील डी. डी. कॉटनचे व्यवस्थापकीय संचालक अरुण सेखसारिया म्हणाले, की चीनमधील व्यापाऱ्यांनी नुकतेच भारतातून नोव्हेंबर-डिसेंबरच्या शिपमेंटवर ५ लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले आहे. हे करार ८८ ते ९२ सेंट प्रतिपौंडने झाले आहेत. चीनचा संरक्षित साठा २०१५ पासून कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. चीन आता हा संरक्षित साठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे. 

कापूस साठ्याची आणि उत्पादनाची स्थिती पाहता चीन आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या कापूस हंगामात भारतातून किमान २० लाख गाठी आयात करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये साठ्यातील घट आणि येणाऱ्या कापूस हंगामात हवामानाचा फटाक कापूस पिकाला बसून उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी होण्याच्या भीतीने चीनमध्ये पुरवठ्यात घट झाली आणि एप्रिलपासून कापसाच्या दरात १८ टक्के वाढ झाली आहे.   

चीन कॉटन असोसिएशनने मात्र कापसाचा तुटवडा नसून दर आवक्यात राहतील असे म्हटले आहे. मात्र, चीन नॅशनल कॉटन रिझर्व्हस् कॉर्प्स ने ज्या कंपन्या कापड उद्योगाशी निगडित नाहीत त्यांना दैनंदिन कापूस लिलावात सहभागी होण्यास निर्बंध घातले आहेत. त्यावरून चीन येत्या वर्षात विदेशातून आयात वाढण्याची शक्यता आहे. सध्या जगात फक्त भारतात पर्याप्त कापूस उपलब्ध आहे.

‘‘आतापर्यंत भारातातून ६५ लाख गाठी निर्यात झाली आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या कापूस हंगामापर्यंत ही निर्यात ७५ लाख गाठींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मला विश्वास आहे की भारत यंदा ७५ ते ७८ लाख गाठी कापूस निर्यात करेल. बांगलादेश हा सर्वांत मोठा कापूस आयातदार देश आहे, त्यानंतर व्हिएतनाम, चीन, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचा नंबर लागतो,’’ असेही अरुण सेखसारिया म्हणाले

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...