agrowon news in marathi, government declare stability fund for milk issue, Maharashtra | Agrowon

दूधप्रश्नी सरकारचा स्थिरता निधीचा उतारा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई : दूध दरातील चढउतारामुळे उत्पादक शेतकऱ्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘दूध दर स्थिरता निधी’ची नवी मात्रा लागू केली आहे. कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून दुधाच्या पुष्टकाळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करणे शक्य व्हावे, यासाठी सहकारी दूध संघांनी ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. 

मुंबई : दूध दरातील चढउतारामुळे उत्पादक शेतकऱ्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘दूध दर स्थिरता निधी’ची नवी मात्रा लागू केली आहे. कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून दुधाच्या पुष्टकाळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करणे शक्य व्हावे, यासाठी सहकारी दूध संघांनी ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. 

दरम्यान, या शासकीय निर्णयाद्वारे सरकार स्वतःवरची जबाबदारी झटकत असून, अशा तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी शेतकऱ्यांना सरळ अनुदान द्यावे, अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने केली आहे. दूध उत्पादकांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने तिसऱ्यांदा उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरवातीला सरकारने दूध पावडर बनविण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे ३ रुपयाचे अनुदान जाहीर केले.

पावडर उत्पादनात यामुळे २० टक्क्यांनी वाढ होऊन प्रश्न मार्गी लागेल असे राज्य सरकारला वाटले होते. प्रत्यक्षात आता अनुदानाची महिनाभराची मुदत संपत आली आहे. तरीही या उपायामुळे दूध दरात फरक पडलेला नाही. त्यानंतर सरकारने संघांना ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणवत्तेच्या दुधाऐवजी ३.२ फॅट व ८.३ एस.एन.एफ गुणवत्तेचे दूध खरेदी करण्यास सांगितले. अशा दुधाला किमान २६ रुपये १० पैसे इतका दर द्यावा असेही सांगण्यात आले आणि आता स्थिरता निधीची तिसरी उपाययोजना सरकारने केली आहे. 

राज्य सरकारने बुधवारी (ता. १३) रोजी ‘स्थिरता निधी’ स्थापन करण्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. दूध संघ आणि शेतकरी यांच्यात परस्पर आर्थिक समन्वय राखणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. शासन आदेशानुसार कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नामधून दुधाच्या पुष्टकाळात तोट्याची आर्थिक भरपाई करणे शक्य व्हावे व दूध व्यवसायात दूध खरेदी दरात स्थिरता राहावी, यासाठी सहकारी संघांनी संकलित केलेल्या दुधामागे सहकारी दूध संघ व दूध सभासद यांनी प्रत्येकी प्रतिलिटर वाजवी रक्कम ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा असे म्हटले आहे. त्यासाठी ही रक्कम वेगळ्याने स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी व पुष्ट काळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असा आदेश सहकारी संस्थांना दिला आहे.

मात्र, सहकारी संस्थांनी कृश काळात यासाठी किती निधीची कपात करावी याबाबत स्पष्ट उल्लेख आदेशात देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आदेशानुसार नाममात्र जुजबी रक्कम कपात करून संस्था आदेशाचे पालन केल्याचे दाखवू शकतात, अशी शक्यता शेतकरी संघर्ष समितीकडून व्यक्त होत आहे. तसेच हा आदेश फक्त सहकारी दूध संघांसाठी आहे, यात खासगी संघांवर कोणतेही बंधन नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे. 

  शेतकऱ्यांना सरळ अनुदान द्या..
सरकारने हा आदेश काढून पुन्हा एकदा दूधप्रश्नी निरुपयोगी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थिरता निधी स्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी सहकारी संस्थांवर सोपवून सरकारने अंगाला झळ लागू न घेता ‘विश्वामित्री’ पवित्रा घेतला आहे. सरकार या स्थिरता कोषात काडीचेही योगदान देणार नाही, हे आदेशातून स्पष्ट होत आहे. सरकारच्या या आदेशाचा दूध प्रश्न सोडविण्यासाठी काडीचाही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर या अशा निरुपयोगी उपायांमुळे मीठच चोळले जात आहे. सरकारने अशा निरुपयोगी मलमपट्ट्या थांबवाव्यात व शेतकऱ्यांना सरळ प्रतिलिटर अनुदान देऊन तातडीने ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीचे अजित नवले यांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...