कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस

कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस
कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस

पुणे: मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस पडत आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली अाहे. पावसाने नद्यांना पूर आला असून, कोकणात अनेक नद्यांनी पात्र सोडले आहे. धरणांच्या पाणलोटात पडत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.  कोकण, घाटमाथा, विदर्भात गुरुवारपासून पावसाने दणक्यात सुरवात केली असून, जवळपास ७० हून अधिक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शिर्सी येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक २१६ मिलिमीटर, तर साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे २०१ आणि रत्नागिरीच्या जैतापूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. तर, घाटमाथ्यावरील दावडी येथे २६० मिलिमीटर, ताम्हिणी येथे २३०, शिरगाव २१० आणि डुंगरवाडी येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  नागपूरात पावसाची दमदार बॅटींग... पहा Video..

शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : वौशी ७२, उरण ७०, कापरोली ७१, आटोने ११६, महाड १३८, इंदापूर ९२, गोरेगाव ८९, लोनेरे ७६, पोलादपूर १११, कोंडवी ११४, वाकण १०९, खेरडी १०८, मरगतम्हाणे ८५, रामपूर ११०, वाहल ९५, सावरडे १७८, असुरडे १४०, शिरगाव १४५, दापोली ८८, बुरवंडी ९०, दाभोल १२१, अंजरला ८८, वाकवली ११०, पालगड १२०, वेलवी १०९, खेड १२०, अंबवली ११२, कुलवंडी ७४, भारने १४८, दाभील ७५, धामनंद ९४, पटपन्हाले ९७, अबलोली १२०, हेडवी ७६, मंडणगड ७०, म्हाप्रल ६३, देव्हरे ७६, तरवल ८७, कडवी ११५, मुरडव ११५, माखजन ११४, फुंगुस ८२, फनसावणे १६२, अंगवली १०२, कोडगाव १०२, देवरूख ९७, तुलसानी ७०, तेरहे १०८, राजापूर ८६, सवंडल ११२, जैतापूर २००, कुंभवडे ८४, नाटे ७३, ओनी ९५, पाचल ९८, लांजा ७६, भांबेड ११५, पुनस ७४, सातवली ७३, विलवडे ९५, पाटगाव १२५, सावंतवाडी १७०, बांडा ११६, आजगाव १८४, अंबोली १५५, मदुरा १६२, वेंगुर्ला १००, शिरोडा १४५, म्हापण १०७, वेटोरे १०५,  कणकवली ७०, फोंडा १३७, सांगवे ९२, नांदगाव ७९, तालेरे ७७, कुडाळ ११५, कडवल १५७, कसाल ६०, वलवल ८४, मानगाव १२७, पिंगुली ९५, वैभववाडी १३३, येडगाव १६२, भुईबावडा १४५, तालवट १८८.

मध्य महाराष्ट्र : पौड ९२, घोटावडे ८३, माले ९०, मुठे १५५, पिरंगुट ४४, भोलावडे ९२, निगुडघर ५०, काले ८१, कार्ला ५२, लोणावळा ७०, वेल्हा ५७, पानशेत १०८, राजूर ९१, सातारा ६१, खेड ६२, वर्ये ५०, कण्हेर ५७, शेंद्रे ६४, आंबवडे ६७, दहिवड ८७, परळी ८५, जावळी मेढा ६८, बामणोली १५०, केळघर ८७, म्हावशी ६६, हेळवाक १०२, मोरगिरी ५६, महाबळेश्‍वर २०१, तापोळा १९५, लामज १९८, पन्हाळा ४०, कोतोली ७६, बांबवडे ४७, करंजफेन ८७, मलकापूर ७७, आंबा ९९, राधानगरी ११३, सरवडे ५४, कसबा ७०, आवळी ६७, राशिवडे ४२, कसबा ४८, गगनबावडा ११६, साळवण ९५, केनवडे ४५, मुरगुड ५९, बिद्री ४६, नेसरी ४२, कडेगाव ७०, कराडवाडी ८२, आजरा ८१, गवसे १६०, चंदगड ७६, नारंगवाडी ६४, माणगाव ५७, तुर्केवाडी ७८, हेरे ९६.

मराठवाडा : उस्मानपुरा ४६, चिखलठाण ४५, लाडसावंगी ४०, वाडोदबाजार २६, आनवा २२, वागरूळ २०, विरेगाव ३०, पांचवडगाव ३०, सातोणा ३२, पांगरी ३४, हनुमंत २९, नांदूरघाट ३७, नांदेड शहर २०, नांदेड ग्रामीण २५, तुप्पा २५, वसरणी ५१, विष्णुपुरी ३८, लिंबगाव २१, तरोडा २२, येवती २०, लोहा २६, कलंबर ४१, तामसा २३, भोकर ३८, मोघाळी २५, मातूळ २०, किनी ३२, देगलूर २२, शहापूर २५, किनवट ४५, बोधडी २७, मुदखेड २४, मुगट २३, बारड ३०, माहूर ५४, वाई २२, उमरी २९, सिंधी २२, अर्धापूर ३९, दाभड २१, मालेगाव ४२, परभणी शहर २०, जांब २८, ताडकळस २५, कांतेश्‍वर २२, चुडवा २१, सेलू २६, कुपटा २८, डोंगरकडा २२, वसमत २८, हयातनगर ४०, हट्टा २९, औंढा २७, येहळेगाव (तुकाराम) २४, आजेगाव २०.

विदर्भ : कुटासा ४४, पाथर्डी ४८, निंबा ४३, अकोला ४०, पळसो ४०, मूर्तिजापूर ६६, हादगाव ५९, जामठी ५७, शेलू बाजार ८६, उंबरडा ४२, येवता ४०, पापळ ५५, वाठोदा ६२, दर्यापूर ४०, अंजनखेड ६०, माणिकवाडा ४१, वणी ४१, कुंभा ४०, खारंगणा ६१, तळेगाव ५५, सेलू ४४, शिंदी ४२, पुलगाव ४३, सावळी ४९, वडनेर ५३, पोन्हा ४७, गिरड ४५, निंदोरी ४४, कोरा ४३, वायगाव ४३, नागपूर ६१, खापरी ८८, बोरी ६०, कामठी ५०, वडोदा ५९, दिघोरी ५१, गुमगाव ६५, टकलघाट ४९, मुसेवाडी ५२, निमखेडा ४८, मौदा १११, खाट ४८, धानळा ६३, चाचेर ४२, कोडामेंडी ५७, उमरेड १७८, बेला ४७, शिर्सी २१६, हेवंती १३५, पाचगाव १०९, मळेवाडा ९२, नंद १३५, भिवापूर १११, कारेगाव १०४, कुही ८०, मंधाळ ६५, पाचखेडी ७७, वेलतूर ६९, राजोली ७८, तितूर ६५, भंडारा ४७, पहेला ६९, तुमसर ४८, शिवरा ६०, मिटेवणी ६८, अड्याळ ८०, कोंढा १०४, पवनी ११४, चिंचळ ४१, असगाव १०६, आमगाव ९१, विरळी ५६, लाखंदूर ४२, मासाळ ७२, रत्नारा ४३, गोंदिया ७८, खामरी ४१, कामठा ६०, तिरोडा ४०, मुंडीकोटा ४१, अर्जुनी ४६, महागाव ५६, चंद्रपूर ४९, वरोरा ५०, माधेली ४०, तेमुर्डा ४५, शेगाव ५०, खांबडा ६०, चिकनी ५५, भद्रावती ६७, नांदोरी ५७, चांदनखेडा ४८, मुधोळी ४८, मांगळी ४९, धोडपेठ ५४, चिमूर ४५, खडसंगी ४२, भिसी ४३, शंकरपूर ४१, गांभूळघाट ८५, ब्रह्मपुरी ६८, अन्हेर ४०, चौगण ४७, मेंडकी ४४, नागभिड ६८, मेंढा ७७, तालोधी ५६, मिढाळा ५४, बल्लारपूर ४७, सिरोंचा ६५, बामणी १०८.६, असारळी ४६, जिमलगट्टा ६५, अल्लापाल्ली ४०, पेरमिली ५२, कोर्ची ४७, कोटगुळ ५०, तरडगाव ४०, भामरागड ५५.  कोकण, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा  माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सक्रिय झाल्याने राज्यात पावसाने जाेर धरला असून, मंगळवारपर्यंत (ता. १०) कोकणात, तर रविवारपर्यंत (ता. ८) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे दावडी २६०, ताम्हिणी २३०, शिर्सी २१६, शिरगाव २१०, महाबळेश्‍वर २०१, जैतापूर २००, डुंगरवाडी २००. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com