कोकणात पावसाचा धुमाकूळ; मंगळवारपर्यंत धुवाधार

कोल्हापूर ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी (ता. ७) औरवाड पुलावरून घेतलेले छायाचित्र.
कोल्हापूर ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी (ता. ७) औरवाड पुलावरून घेतलेले छायाचित्र.

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला अाहे. शनिवारी (ता.७) सकाळपासून कोकणात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. तर, मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. तर, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने दणका दिला आहे. राज्यात १५० पेक्षा अधीक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.  कोकणसह विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची, तर बऱ्याच ठिकाणी २००  मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली अाहे. नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. खापरी येथे सर्वाधिक ३४६ मिलिमीटर, तर सेनगाव येथे ३१५ आणि कान्होलीबारा ३०१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तर, मराठवाड्यात मध्यम पावसाची नोंद झाली.  शनिवारी (ता. ७ ) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये ः स्त्रोत - कृषी विभाग) ः कोकण : टिटवाळा १०३, मुरबाड २१६, पडघा १२१, शहापूर ११०, खर्डी १३५, वसींड १९५, गोरेगाव २१९, कुंभर्ली १०३, बदलापूर १३२, कर्जत १४६, नेरळ १९४, कडाव १०५, कशेले १२४, नाटे १६४, कोंडवी ११०, वाकण १२५, वाडा २२६, कडूस २६८, कोणे २०८, कसा १११,  जव्हार १८०, साखर १९२, मोखडा १२१, खोडला १३६, विक्रमगड १०३, तलवड १८०. मध्य महाराष्ट्र :  सुरगाणा ८८, इगतपुरी ८३, हर्सूल ९७, मुठे ८३, भोलावडे ७५, आंबवडे ७६, निगुडघर ९२, वडगाव मावळ ६०, काले १३२, कार्ला १३६, खडकाळा १०६, लोणावळा १५१, शिवणे ६५,  कुडे ६५, हेळवाक ९६, महाबळेश्‍वर १५१, तापोळा १६७, लामज १७१, करंजफेन ७२, आंबा ८६, राधानगरी ६०, कडेगाव ८०, चंदगड ६५, नारंगवाडी ६१, माणगाव ६२, हेरे ६३. मराठवाडा :  नेकनूर ३४, वाडवणी ३६, हदगाव ४४, निवघा ३२, तामसा ३९, पिंपरखेड ३८, आष्टी ४४, किनवट ४०, बोधडी ३०, शिवणी ३२, हिमायतनगर ६२, जवळगाव ४९, सरसम ४५,  सिंदखेड ३०, आखाडा बाळापूर ३१,  विदर्भ :  वणी ९५, पुनवट ९०, शिंदोळा ९२,  कुंभा ९०, वडकी ९२, सेलू १४७, हिंगणी १३५, केळझर २०९, हिंगणघाट २००, समुद्रपूर २८०, जाम ११२, वायगाव १८५, खांढळी २१०, नागपूर २८२, सीताबार्डी १८५, पार्डी १२२, खापरी ३४७, बोरी ११०, वाडी २०६, हुडकेश्‍वर २२०, सोनगाव ३१५, कोरडी १३२, दिघोरी १०४, हिंगणा २७३, वानाडोंगरी २७३, कान्होलीबारा ३०१, आडेगाव १७६, गुमगाव २४९, टकलघाट २६५. रामटेक १७०, मुसेवाडी १२१, आमडी १२१, पारशिवणी १९३, नावेगाव १०५, कान्हान ९४, मौदा ९५, सावनेर ११६, खापा ११०, पाटनसांवंगी ९६, तेलकामठी ९०, उमरेड १३४, बेला १९९, शिर्सी ९५, पाचगाव १५२, कुही १००, राजोली १००, तितूर १४१, घुगस १०४, पडोली ९०, वरोरा १२५, माधेली १२०, तेमुर्डा १३०, भद्रावती १२१, नांदोरी ११४, चांदनखेडा ११४, मुधोळी १११, धोडपेठ १०४, चिमूर १६७, खडसंगी १४९, नेरी १३४, मासाळ १३१, कोपर्णा २११, गडचांदूर २००,  बल्लारपूर १४८, जेवती १६५, पाटण १७०.

मंगळवारपर्यंत ‘धुवाधार’ चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावाने वायव्य बंगालाच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर, दुसरीकडे दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस आणि दक्षिण गुजरातपासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा, केरळ तमिळनाडूनच्या परिसरावर पूर्व पश्‍चिम हवेचे जोडक्षेत्र स.िक्रय असल्याने महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये धुवाधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले आहे. मंगळवारपर्यंत (ता.१०) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार, तर विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  • नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी 
  • अनेक ठिकाणी २०० पेक्षा अधिक पाऊस
  • नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक जोर
  • खापरी ३४६, सेनगाव ३१५, कान्होलीबारा ३०१ मिलिमीटर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com