agrowon news in marathi, heavy rain in Kokan, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकणात पावसाचा धुमाकूळ; मंगळवारपर्यंत धुवाधार

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला अाहे. शनिवारी (ता.७) सकाळपासून कोकणात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. तर, मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. तर, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने दणका दिला आहे. राज्यात १५० पेक्षा अधीक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. 

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला अाहे. शनिवारी (ता.७) सकाळपासून कोकणात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. तर, मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. तर, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने दणका दिला आहे. राज्यात १५० पेक्षा अधीक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. 

कोकणसह विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची, तर बऱ्याच ठिकाणी २००  मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली अाहे. नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. खापरी येथे सर्वाधिक ३४६ मिलिमीटर, तर सेनगाव येथे ३१५ आणि कान्होलीबारा ३०१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तर, मराठवाड्यात मध्यम पावसाची नोंद झाली. 

शनिवारी (ता. ७ ) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये ः स्त्रोत - कृषी विभाग) ः
कोकण : टिटवाळा १०३, मुरबाड २१६, पडघा १२१, शहापूर ११०, खर्डी १३५, वसींड १९५, गोरेगाव २१९, कुंभर्ली १०३, बदलापूर १३२, कर्जत १४६, नेरळ १९४, कडाव १०५, कशेले १२४, नाटे १६४, कोंडवी ११०, वाकण १२५, वाडा २२६, कडूस २६८, कोणे २०८, कसा १११,  जव्हार १८०, साखर १९२, मोखडा १२१, खोडला १३६, विक्रमगड १०३, तलवड १८०.
मध्य महाराष्ट्र : सुरगाणा ८८, इगतपुरी ८३, हर्सूल ९७, मुठे ८३, भोलावडे ७५, आंबवडे ७६, निगुडघर ९२, वडगाव मावळ ६०, काले १३२, कार्ला १३६, खडकाळा १०६, लोणावळा १५१, शिवणे ६५,  कुडे ६५, हेळवाक ९६, महाबळेश्‍वर १५१, तापोळा १६७, लामज १७१, करंजफेन ७२, आंबा ८६, राधानगरी ६०, कडेगाव ८०, चंदगड ६५, नारंगवाडी ६१, माणगाव ६२, हेरे ६३.
मराठवाडा : नेकनूर ३४, वाडवणी ३६, हदगाव ४४, निवघा ३२, तामसा ३९, पिंपरखेड ३८, आष्टी ४४, किनवट ४०, बोधडी ३०, शिवणी ३२, हिमायतनगर ६२, जवळगाव ४९, सरसम ४५,  सिंदखेड ३०, आखाडा बाळापूर ३१, 
विदर्भ : वणी ९५, पुनवट ९०, शिंदोळा ९२,  कुंभा ९०, वडकी ९२, सेलू १४७, हिंगणी १३५, केळझर २०९, हिंगणघाट २००, समुद्रपूर २८०, जाम ११२, वायगाव १८५, खांढळी २१०, नागपूर २८२, सीताबार्डी १८५, पार्डी १२२, खापरी ३४७, बोरी ११०, वाडी २०६, हुडकेश्‍वर २२०, सोनगाव ३१५, कोरडी १३२, दिघोरी १०४, हिंगणा २७३, वानाडोंगरी २७३, कान्होलीबारा ३०१, आडेगाव १७६, गुमगाव २४९, टकलघाट २६५. रामटेक १७०, मुसेवाडी १२१, आमडी १२१, पारशिवणी १९३, नावेगाव १०५, कान्हान ९४, मौदा ९५, सावनेर ११६, खापा ११०, पाटनसांवंगी ९६, तेलकामठी ९०, उमरेड १३४, बेला १९९, शिर्सी ९५, पाचगाव १५२, कुही १००, राजोली १००, तितूर १४१, घुगस १०४, पडोली ९०, वरोरा १२५, माधेली १२०, तेमुर्डा १३०, भद्रावती १२१, नांदोरी ११४, चांदनखेडा ११४, मुधोळी १११, धोडपेठ १०४, चिमूर १६७, खडसंगी १४९, नेरी १३४, मासाळ १३१, कोपर्णा २११, गडचांदूर २००,  बल्लारपूर १४८, जेवती १६५, पाटण १७०.

मंगळवारपर्यंत ‘धुवाधार’
चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावाने वायव्य बंगालाच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर, दुसरीकडे दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस आणि दक्षिण गुजरातपासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा, केरळ तमिळनाडूनच्या परिसरावर पूर्व पश्‍चिम हवेचे जोडक्षेत्र स.िक्रय असल्याने महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये धुवाधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले आहे. मंगळवारपर्यंत (ता.१०) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार, तर विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  • नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी 
  • अनेक ठिकाणी २०० पेक्षा अधिक पाऊस
  • नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक जोर
  • खापरी ३४६, सेनगाव ३१५, कान्होलीबारा ३०१ मिलिमीटर

इतर अॅग्रो विशेष
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...