agrowon news in marathi, heavy rain possibilities from Saturday, Maharashtra | Agrowon

शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे : किनारपट्टीवरील मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यासह उत्तर कोकणाला पावसाने झोडपले आहे; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत अाहे. मराठवाडा, खानदेशात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसासाठी अनुकूल हवामान तयार होत असल्याने शनिवारपासून (ता.१४) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

पुणे : किनारपट्टीवरील मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यासह उत्तर कोकणाला पावसाने झोडपले आहे; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत अाहे. मराठवाडा, खानदेशात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसासाठी अनुकूल हवामान तयार होत असल्याने शनिवारपासून (ता.१४) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडला. पावसामुळे सर्वदूर पाणी साचल्याने रेल्वे, रस्तेवाहुकीसह जनजीवन विस्कळित झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता.

पालघर जिल्ह्यातील निर्मल आणि माणिकपूर येथे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे आजरा (जि. कोल्हापूर) तालुक्‍यात हिरण्यकेशी नदीने पात्र सोडले. कोयनेसह प्रमुख धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली; तर विदर्भातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले अोसंडून वाहत अाहेत. मंगळवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे जलमय झाली होती. हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून, शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. पुराचा तडाखा बसलेल्या भागात जमीन खरडून गेली आहे.

बुधवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग)

कोकण : ठाणे १६६, बलकुम १४२, भाइंदर १५३, मुंब्रा १७३, दहिसर १३८, बेलापुर १३६, कल्याण १५०, ठाकुरली १४७, नडगांव १५५, भिवंडी १००, अप्पर भिवंडी १४४, उल्हासनगर १९७, अंबरनाथ १६२, कुंभर्ली ११०, बदलापूर १४८, पनवेल १४०, ओवले ११७, कर्नाळा १३३, तलोजे १२२, कर्जत ११५, नेरळ १०२, कडाव १०९, कशेले ११०, खालापूर चौक १२७, खोपोली १२२, उरण १२५, काेपरोली १३५, जसइ १६०, पेण १५५, हमरापूर १०८, वशी १२३, कसू १३०, कामरली १०३, महाड ११४, खारवली १०५, माणगाव ११५, इंदापूर १५२, रोहा १४७, नागोठणे १००, कोलाड १२५, पोलादपूर १०८, वाकण ११०, मेंढा १५५, अंबवली ११९, राजापुर १०५, जैतापूर १३२, सावंतवाडी १३३, बांदा १४९, अंबोली १६०, मदुरा १०५, कणकवली १३१, नांदगाव ११३, कडवल १११, मानगाव १४७, तालवट १२१, भेडशी १३३, वसई १५९, मांडवी १६२, अगशी १५५, निर्मल २०७, विरार १८२, मानिकपूर २०७, बोईसर १०९, सफला १४३, अगरवाडी १४५, साखर १८९, तलवड ११७.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ६६, वेळुंजे ६५, हर्सूल ५०, धुळे शहर ४२, कुडाशी ४८, म्हसावद ४५, धानोरा ६२, अडावद ४०, पारोळा ४८, तामसवाडी ९१, बहादरपूर ४२, पौड ७२, घोटावडे ५९, माले ११८, मुठे ७९, पिरंगूट ५५, भोलावडे १०५, निगुडघर ५१, काले ८५, लोणावळा ९०, पानशेत ८४, बामणोली ८६, हेळवाक ८१, ढेबेवाडी ५१, कुठरे ५५, महाबळेश्‍वर १२३, तापोळा १३१, लामज १४५, चरण ४५, बाजार ५४, करंजफेन ९६, मलकापूर ५४, आंबा १०६, राधानगरी ८०, सरवडे ४७, कसबा ४१, आवळी ४९, कसबा ५२, गगनबावडा ६३, साळवण ११९, नेसरी ५२, गारगोटी ४५, पिंपळगाव ७३, कडेगाव ६५, कराडवाडी ७५, आजरा ४०, गवसे ६४, चंदगड १०६, नारंगवाडी ५८, माणगाव ६८, तुर्केवाडी ४६, हेरे १२७.

मराठवाडा : चिंचोली २८, सिल्लोड २०, भराडी ३५, गोळेगाव २३, अजिंठा २४, आमठाणा २५, आंभाई २१, सिपोरा २७, आनवा २०, टेंभुर्णी २१, वरूड २५, मांडवी २७, दहेली २४, सिरसम ३३, बासंबा ४०, माळहिवरा ३०, गोरेगाव ३८, आजेगाव २१.

विदर्भ : जळगाव १२०, जामोद ५४, कोलारा ६१, मेरा ९०, हातणी ५८, मेहकर ६८, जानेफळ ५८, डोणगाव ६६, देऊळगाव ६२, अंजनी ८६, नायगाव ५६, साखरखेर्डा ५०, हादगाव ६३, निंबा ११०, कुरूम ६०, जामठी १२०, नागठाणा ७०, कोंढाळा ५५, केनवड ८२, गोवर्धन ९२, रिठद ६५, मालेगाव ४५, शिरपूर ५८, मुंगळा ५५, चांडस ८२, हिवरा ५१, धारणी ७५, हरीसळ ६०, धुळघाट ६२, सावळीखेडा ८१, सेमडोह ५४, निंभा ५७, नांदगाव खंडेश्‍वर ११८, शिवणी १०८, मंगरूळ ८५, पापळ ७६, लोणी ५५, धानोरा १३८, माहुली ११४, पळसखेड ५४, गुहीखेड ५५, रामतीर्थ ५३, महागाव ५७, जवळा ५४, माणिकवाडा ६३, पुसद ६६, शिंदोळा ५५, शिबला ५१, पांढरकवडा ६७, रुंजा ६०, घाटंजी ८५, साखरा ५२, शिवणी ५८, सावळी ५७, आष्टी ६१, एटापल्ली ५४, कासंसूर ५१, जरावंडी ५२, गाट्टा ५८, मुलचेरा १०२.

कमी दाब क्षेत्राचे संकेत
उत्तर ओडिशा आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१३) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यातच माॅन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा (माॅन्सून ट्रफ) सर्वसाधारण स्थितीमध्ये असून, सोमवारपर्यंत (ता. १६) तो सक्रिय राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मॉन्सूनही सक्रिय राहून, शनिवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.


इतर अॅग्रो विशेष
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...