काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या चांदोली (वारणा) धरण भरले असून रविवारी (ता.१५) ५२९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या चांदोली (वारणा) धरण भरले असून रविवारी (ता.१५) ५२९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने राज्यात पाऊस पडत आहे. मंगळवापर्यंत (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (ता.१६) काेकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची झोडधार सुरूच आहे. तर मध्य महाराष्ट्रातही पावसाने जोर धरला आहे. विदर्भातही जोरदार पाऊस पडत असून, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली (वारणा) धरणातून ५ हजार २९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने वारणेकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भुरभूर सुरू असल्याने रविवारी दुपारपर्यंत ७० बंधारे पाण्याखाली गेले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस सुरू असून, धरणांमध्ये वेगाने पाणी जमा होत आहे. अनेक धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर गेला आहे. नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने भंडारदरा, मुळा धरणात पाण्याची आवक होत आहे. रविवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) कोकण : नेरळ १७०, कळंब १४५, मेंढा ९५, धामनंद ९२, देवरुख ११७, सवंडल ९४, पाचल ११६, लांजा ११०, भांबेड १६३, पुनस १३४, सातवली ११३, विलवडे १४५, कांचड ९७, साइवन १४२, कसा १३४, चिंचणी ९६, पालघर ९८, मनवर १०३, बोयसर ९३, सफला ९८, अगरवाडी ९५, तारापूर ९७, जव्हार १७०, साखर १७५, मोखडा १६९, खोडला १७५, तलासरी १०८, झरी १०५, विक्रमगड १३६, तलवड ११६. मध्य महाराष्ट्र : नाणशी ७९, इगतपुरी १५२, घोटी ८१, धारगाव १३०, पेठ ८७, जागमोडी ७८, कोहोर ६७, त्र्यंबकेश्‍वर ९९, वेळुंजे १७५, हर्सूल ८०, साकीरवाडी ७०, राजूर ६५, शेंडी १२८, माले ७२, मुठे ९३, भोलावडे १३२, काले ६०, कार्ला ७०, खडकाळा ६२, लोणावळा १३६, राजूर १०९, बामणोली ७५, हेळवाक ७६, महाबळेश्‍वर १२५, तापोळा ११८, लामज १३८, करंजफेन ९८, आंबा ११९, राधानगरी ११६, कडेगाव ८०, कराडवाडी ७०, आजरा ७७, मडिलगे १२०, चंदगड ८८, हेरे ९१. मराठवाडा : जळकोट ३०, नळदुर्ग ३८, डाळिंब ३७, मुलाज ३८, मुरूम ४०, कंधार ४५, कुरूळा ३६, माळाकोळी ४३, गोळेगाव ४०. विदर्भ : वाशीम ४१, अनसिंग ३४, राजगाव ४२, नागठाणा ४७, केकतउमरा ४५, कोंढाळा ४७, केनवड ४७, गोवर्धन ६१, रिठद ४१, किन्हीराजा ५१, मुंगळा ४०, मेडशी ४६, करंजी ६०, चांडस ४५, लोणी ६५, पवनी ५०, दासगाव ४२, रावणवाडी ६७, कामठा ८७, काट्टीपूर ६३, आमगाव ५५, ठाणा ८९, तिगाव ७३, कवरबांध ४८, सालकेसा ६३, दारव्हा ५४, असारळी ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com